मध्य रेल्वे नागपूर विभागात डिजिटल हिंदी पंधरवडा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:08 AM2021-09-18T04:08:31+5:302021-09-18T04:08:31+5:30

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील डीआरएम रिचा खरे आणि अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक जय सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली राजभाषा पंधरवडा साजरा ...

Digital Hindi Fortnight in Central Railway Nagpur Division () | मध्य रेल्वे नागपूर विभागात डिजिटल हिंदी पंधरवडा ()

मध्य रेल्वे नागपूर विभागात डिजिटल हिंदी पंधरवडा ()

Next

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील डीआरएम रिचा खरे आणि अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक जय सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली राजभाषा पंधरवडा साजरा करण्यात आला. रिचा खरे यांनी महाव्यवस्थापकांचा हिंदी दिनानिमित्त पाठविलेल्या संदेशाचे वाचन करून विविध स्पर्धातील विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले. पंधरवड्यात हिंदी निबंध, भाषण, युनिकोड टंकलेखन, अमृत काव्य वाचन, स्वरचित लघुकथा लेखन, वाचन स्पर्धा, प्रश्नमंजुषा आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. वरिष्ठ राजभाषा अधिकारी पूर्णिमा तलवारे यांच्या नेतृत्वात या स्पर्धेत परीक्षक म्हणून पेरी भगवती राव, मंगेश काशीमकर, अनंत श्रीमाळी, राजेंद्र वर्मा, कृष्ण प्रसाद तिवारी यांनी काम पाहिले. या स्पर्धांत ३६९ रेल्वे कर्मचारी सहभागी झाले. पंधरवड्याच्या आयोजनासाठी बाळकृष्ण महाजन, आशिष धकाते, विजया घाटे, राजेश शाहु, राजेंद्र वंजारी, पद्मिनी बिंड यांनी सहकार्य केले.

..................

Web Title: Digital Hindi Fortnight in Central Railway Nagpur Division ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.