डिजिटल इंडिया फक्त फलकापुरतीच मर्यादित़
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 10:37 AM2018-11-02T10:37:35+5:302018-11-02T10:38:03+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया निर्माण करण्यासाठी लोकांना कॅशलेस व्यवहार करून सहकार्याची भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र नागपूर शहरातील पेट्रोलपंपावर कॅशलेस व्यवहार करण्याला स्पष्ट नकार दिला जात आहे.
फहीम खान ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया निर्माण करण्यासाठी लोकांना कॅशलेस व्यवहार करून सहकार्याची भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र नागपूर शहरातील पेट्रोलपंपावर कॅशलेस व्यवहार करण्याला स्पष्ट नकार दिला जात आहे. पंपावर स्वाईप मशीन लावून डेबिट व क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून पेट्रोल व डिझेलचे पैसे स्वीकारले जातात. परंतु डिजिटल इंडिया अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या भारतीय पेमेंट प्लॅटफार्म ‘भीम’ अॅपच्या माध्यातून बिल स्वीकारले जात नाही. सर्व पेट्रोल पंपांवर डिजिटल पेमेंट करण्यासाठी फलक लावण्यात आलेले आहेत. मात्र ही सुविधा उपलब्ध नाही.
डेबिट कार्डमुळे नुकसान
कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली पेट्रोल पंपावर फक्त क्रेडिट व डेबिट कार्डच्या माध्यमातून बिलाची रक्कम स्वीकारली जाते. क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्याला अशा व्यवहाराचा फायदा मिळतो. परंतु डेबिट कार्डचा वापर केल्यास १०० रुपयांच्या पेट्रोलवर प्रत्येक वेळी ३ रुपयांची कपात केली जाते. १ हजार रुपयांचे पेट्रोल भरणाºयांच्या बँक खात्यातून ३० रुपये कपात केले जातात. दरम्यान काही बँका कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली प्रत्येक कॅशलेस व्यवहारावर २.२५ रुपये देत आहेत. परंतु ही रक्कम ग्राहकांच्या खात्यातून कपात करण्यात आलेल्या रकमेच्या तुलनेत नगण्य आहे.
अॅपवर कॅशलेसची आॅफर
डिजिटल इंडिया अंतर्गत कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन दिले जात आहे. पेट्रोल पंपावर पेमेंट अॅपद्वारे पेमेंट देण्याची सुविधा उपलब्ध असेल तर अशा अॅपमुळे ग्राहकांना कॅ शलेसची आॅफर देण्यात येत आहे. अशा आॅफर्सचा लाभ ग्राहकांना मिळू शकेल. परंतु शहरातील पेट्रोल पंपांवर अशा प्रकारची सुविधा उपलब्ध नाही.