पाटणसावंगी येथे डिजिटल साक्षरता शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:10 AM2021-07-07T04:10:52+5:302021-07-07T04:10:52+5:30
पाटणसावंगी : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँकेच्या पाटणसावंगी (ता. सावनेर) शाखेत मंगळवारी (दि. ६) आर्थिक व डिजिटल साक्षरता शिबिराचे ...
पाटणसावंगी : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँकेच्या पाटणसावंगी (ता. सावनेर) शाखेत मंगळवारी (दि. ६) आर्थिक व डिजिटल साक्षरता शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात अधिकारी, कर्मचारी व खातेदारांना आर्थिक व्यवहार करताना नवीन प्रणालीची प्रक्रिया अडचणी व याेजनांची माहिती देण्यात आली.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नाना राऊत, अनिल सोमकुवर, जानराव केदार, रवींद्र जाधव, प्रशांत बरडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बँकेचे विभागीय अधिकारी माधव दियेवार, बँक शाखा व्यवस्थापक अरुण डांगरे, रेखा चवारे, विजय भोयर उपस्थित हाेते. यावेळी बँक अधिकारी, कर्मचारी व खातेदारांना विविध प्रकारच्या कर्जाचे नियोजन, आर्थिक नियोजन, बचत, गुंतवणुकीचे महत्त्व, पीक विमा, किसान क्रेडिट कार्ड यासह अन्य महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.