डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे महामेट्रोने गाठले लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:07 AM2021-06-02T04:07:29+5:302021-06-02T04:07:29+5:30

नागपूर : कोरोना काळात महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पाने वित्तीय वर्ष २०२०-२१ मध्ये निर्माण कार्य व आर्थिक प्रगती अचूकपणे साध्य केली ...

The digital platform helped Mahometro achieve its goal | डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे महामेट्रोने गाठले लक्ष्य

डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे महामेट्रोने गाठले लक्ष्य

Next

नागपूर : कोरोना काळात महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पाने वित्तीय वर्ष २०२०-२१ मध्ये निर्माण कार्य व आर्थिक प्रगती अचूकपणे साध्य केली आहे. हे यश डिजिटल प्लॅटफॉर्म फाईव्ह डायमेंशनल बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग (५-डी बीम) प्रणालीच्या वापरामुळे शक्य झाले. कठीण परिस्थितीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी गौरवोद्गार काढले.

महामेट्रोने मार्च २०२१ मध्ये ६८५ कोटी रुपये इतका खर्च केला. २०२०-२१ या आर्थिक वर्षात तब्बल ३,३०३ कोटी रुपये इतका खर्च प्रकल्पाच्या कामावर केला. यापूर्वी मार्च २०१९ चा खर्च हा ६६९ कोटी रुपये एवढा असून, २०१८-१९ वर्षात हा खर्च २,८९४ कोटी रुपये एवढा होता. मार्च २०१९ च्या तुलनेत मार्च २०२१ मधील खर्चाची टक्केवारी २.३९ टक्के होती, तर २०१८-१९ च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये ही वाढ १४.१३ टक्के होती.

महामेट्रोचे संचालक (प्रकल्प) महेश कुमार म्हणाले, कोरोना काळातही स्टेशन, व्हायाडक्ट, डबलडेकर पूल आणि ट्रॅकचे निर्माण कार्य पूर्णत्वास नेले. ते कामगार, कर्मचारी आणि अभियंत्यांच्या मनोबलामुळेच शक्य झाले. महामेट्रोचे वित्त संचालक एस शिवमाथन म्हणाले, देशव्यापी लॉकडाऊन असतानाही कामगारांनी आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये चांगले कार्य केले. योग्य नियोजन, कामगारांची योग्य देखभाल, अन्न, निवारा, आदी कामांमुळे शक्य झाले. महामेट्रोचे संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथूर म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीत निर्माण कार्य करताना कामगारांच्या सुरक्षिततेत कुठलीही तडजोड केली नाही. उत्कृष्ट कामगिरीमुळे विक्रम प्रस्थापित करणे शक्य झाले.

Web Title: The digital platform helped Mahometro achieve its goal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.