दीक्षाभूमी : दिले जीवनदान मेलेल्या जीवा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 09:23 PM2019-10-07T21:23:51+5:302019-10-07T21:25:01+5:30

दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले विष्णू शेषराव ओव्हाळ ढोलकीच्या तालावर आणि त्यांच्या पत्नी वंदना पेटीच्या स्वरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या लढ्याची प्रेरणा, त्यांचे तत्त्वज्ञान आणि मानवमुक्तीचे कार्य जनसामान्यांमध्ये रुजवीत आहेत.

Dikshabhoomi: Life given to the dead ... | दीक्षाभूमी : दिले जीवनदान मेलेल्या जीवा...

दीक्षाभूमी : दिले जीवनदान मेलेल्या जीवा...

Next
ठळक मुद्देअंध विष्णू ओव्हाळ पेरतात गाण्यातून बाबासाहेबांचे विचार

नागपूर : कोटी रोग्यांना देवूनी दवा,
आला डॉक्टर बनूनी नवा,
दिले जीवनदान मेलेल्या जीवा...
अशा सोप्या शब्दातील गाण्यातून बाबासाहेबांच्या कार्यांची महती दीक्षाभूमीवर गाऊन उपस्थितांच्या थेट हृदयात साद घातली जात होती. दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले विष्णू शेषराव ओव्हाळ ढोलकीच्या तालावर आणि त्यांच्या पत्नी वंदना पेटीच्या स्वरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या लढ्याची प्रेरणा, त्यांचे तत्त्वज्ञान आणि मानवमुक्तीचे कार्य जनसामान्यांमध्ये रुजवीत आहेत.
दीनदलितांच्या उद्धाराचा मार्ग खुला करून त्यांना उज्ज्वल भवितव्याची दिशा दाखविणाऱ्या युगनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार गावागावापर्यंत पोहचविण्याचे समाजमनात रु जविण्याचे मोलाचे कार्य आंबेडकरी जलशांच्या माध्यमामधून झाले. बाबासाहेबांचा परिवर्तनवादी विचार हा या आंबेडकरी जलशांचा प्राण आहे. हीच प्रेरणा घेत जालना जिल्ह्यातील मेठा या गावातील ६० वर्षीय शाहीर विष्णू ओव्हाळ आणि त्यांच्या पत्नी वंदना दीक्षाभूमीवर आले. येथील बोधीवृक्षाखाली बुद्धवंदना घेतली आणि बुद्ध-भीम गीतातून बाबासाहेबांचे विचार पेरायला सुरुवात केली. सूर-तालांच्या आविष्कारात विष्णूचे अंधत्व कुठेच आड येत नव्हते. त्यांना साथ देणारा तरुण अनमोल वाळके याची ढोलकीवरील थाप थेट ऐकणाºयाच्या हृदयाला साद घालत होती. ‘भल्याभल्यांना माझ्या भीमानं, पहा कसं लाजवलं, भारतीय संविधान माझ्या भीमानं दिल्लीत गाजवलं’ या त्याच्या गाण्यावर तर अनेक जण थिरकलेही.
विष्णू यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांच्या पुण्याईमुळेच आज गात आहे. आम्हा दोघांना दिसत नसले तरी ज्येष्ठ कवी वामनदादा कर्डक, विष्णू शिंदे आदींची गाणी तोंडपाठ आहे. दीनदलितांच्या उद्धाराचा मार्ग खुला करून त्यांना उज्ज्वल भवितव्याची दिशा दाखविणाऱ्या युगनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोहचविताना मिळणारे समाधान मनाला श्रीमंत करते. असे म्हणत, अनमोल यांनी ढोलकीवर थाप देत लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या ‘उद्धारली कोटी कुळे, भीमा तुज्या जन्मामुळे...’ गाण्याला सुरुवात केली आणि त्यातच ते तल्लीन झाले. त्यांना पेटीवर जयभीम ओव्हाळ साथ देत होते.

Web Title: Dikshabhoomi: Life given to the dead ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.