गंगाजमुना येथील जीर्ण इमारत पाडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:10 AM2020-12-24T04:10:03+5:302020-12-24T04:10:03+5:30

लोकमत न्यूज नेटवकं नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या पथकाने ऑगस्ट महिन्यात गंगाजमुना येथील नामदेव रेवतकर यांची जीर्ण झालेली इमारत ...

The dilapidated building at Gangajmuna was demolished | गंगाजमुना येथील जीर्ण इमारत पाडली

गंगाजमुना येथील जीर्ण इमारत पाडली

Next

लोकमत न्यूज नेटवकं

नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या पथकाने ऑगस्ट महिन्यात गंगाजमुना येथील नामदेव रेवतकर यांची जीर्ण झालेली इमारत पाडली होती. बुधवारी याच भागातील दिगांबर गोटाफोडे यांची जीर्ण इमारत पाडण्याची कारवाई सुरू केली. यात तळमजला व पहिला मजला तोडण्यात आला. या इमारतीत वहीवाटदार म्हणून ९ महिलांचे वास्तव्य होते. त्यांना मनपाने १० नोव्हेंबर २०२० रोजी नोटीस बजावली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. उर्वरित बांधकाम गुरुवारी पाडले जाणार असल्याची माहिती प्रवर्तन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

आशीनगर झोनच्या पथकाने लाल गोडाऊन ते ग्रामीण आरटीओ ते पाटणकर चौक दरम्यानच्या रस्त्यांच्या बाजूला अतिक्रमण करून लावलेले ठेले व दुकानांचे २४ अतिक्रमण हटविले. धंतोली झोनच्या पथकाने उत्कर्ष गृहनिर्माण सोसायटी वाघमारे ले-आऊट येथे मोकळ्या जागेत अतिक्रमण करून उभारलेल्या शाळेचे बांधकाम हटविले.

Web Title: The dilapidated building at Gangajmuna was demolished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.