दिलीप सोनटक्के हत्याकांड; २९ सेकंदांत १९ घाव अन् मृत्यूचा थरार: सीसीटीव्ही फुटेज बोलू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2023 10:24 PM2023-05-18T22:24:38+5:302023-05-18T22:30:54+5:30

Nagpur News पेट्रोलपंप मालक दिलीप सोनटक्के हत्याकांडात पोलिसांनी ताब्यात घेतलेले सीसीटीव्ही फुटेज आता बोलू लागले आहेत. यात केवळ २९ सेकंदांत १९ घाव घालत, आरोपींनी सोनटक्के यांच्या शरीराची अक्षरश: चाळण केल्याचे दिसते.

Dilip Sontakke murder case; 19 injuries and deaths in 29 seconds: Live CCTV footage speaks volumes | दिलीप सोनटक्के हत्याकांड; २९ सेकंदांत १९ घाव अन् मृत्यूचा थरार: सीसीटीव्ही फुटेज बोलू लागले

दिलीप सोनटक्के हत्याकांड; २९ सेकंदांत १९ घाव अन् मृत्यूचा थरार: सीसीटीव्ही फुटेज बोलू लागले

googlenewsNext

नागपूर : पेट्रोलपंप मालक दिलीप सोनटक्के हत्याकांडात पोलिसांनी ताब्यात घेतलेले सीसीटीव्ही फुटेज आता बोलू लागले आहेत. यात केवळ २९ सेकंदांत १९ घाव घालत, आरोपींनी सोनटक्के यांच्या शरीराची अक्षरश: चाळण केल्याचे दिसते.

भिवापूर येथील राष्ट्रीय मार्गावरील पेट्रोलपंपावर बुधवारी (दि. १७) सकाळी १० वाजताच्या सुमारास मालक दिलीप सोनटक्के (६०, रा. नागपूर) यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. यातील आरोपी शेख अफरोज उर्फ इमरान वल्द शेख हनिफ (३३, रा. मोठा ताजबाग, नागपूर) व मोहम्मद वसीम उर्फ सोनू वल्द लाल मोहम्मद (२८, रा. खरबी, नागपूर) या दोघांना उमरेड परिसरातून तर शेख जुबेर शेख कय्यूम (२५, रा. मलीक शाळेजवळ, अख्तर ले-आउट, मोठा ताजबाग, नागपूर) याला नागपूर येथून अटक करण्यात आली. घटनेनंतर पोलिसांनी पेट्रोलपंपाच्या आतील व बाहेरील कॅमेऱ्याचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्यानुसार साधारणत: सकाळी १० वाजताच्या सुमारास मृतक दिलीप सोनटक्के हे आपल्या कारने पेट्रोलपंपावर आले. ऑफिसमधील लहान स्टुलवरती दिलीप तर काऊंटरच्या आत दोन कर्मचारी बसलेले आहेत. त्यांचा हिशोब सुरू असतानाच दुचाकीवरून पेट्रोलपंपावर आलेल्या तिघांपैकी निळा शर्ट घातलेल्या एकाने ऑफिसमध्ये प्रवेश करीत, स्टुलवर बसून असलेल्या दिलीप यांच्यावर चाकूने एकामागून एक वार केले. यावेळी काऊंटरच्या आतमध्ये असलेले कर्मचारी बाहेर पळत सुटले. दिलीप खाली कोसळताच, पांढरा शर्ट घातलेल्या दुसऱ्या आरोपीने व नंतर केशरी शर्ट घातलेल्या तिसऱ्या आरोपीने दिलीप यांच्यावर सलग चाकूने वार सुरू केले. यादरम्यान पेट्रोलपंपाच्या बाहेर असलेला राजेश्वर नान्हे हा कर्मचारी आतमध्ये डोकाऊन पाहत असताना, यातील एका आरोपीने त्याच्या डोक्यावर बंदुकीच्या मागचा भाग मारत त्याला जखमी केले. केवळ २९ सेकंद चाललेला मृत्यूचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झालेला आहे. त्यानंतर आरोपी पळून गेले. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता मृतकाच्या शरीरावर तब्बल १९ घाव घातल्याचे दिसत आहे. या घटनेचा तपास पोलिस अधीक्षक विशाल आनंद, प्रभारी उपविभागीय अधिकारी संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात प्रभारी पोलिस निरीक्षक प्रमोद घोंगे, सहायक पोलिस निरीक्षक शरद भस्मे करीत आहेत.

 

२२ पर्यंत पोलिस कोठडी

अटकेतील तिन्ही आरोपींना गुरुवारी (दि. १८) दुपारी ३ वाजताच्या सुमारास कुही येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. येथे न्या. एन. जे. देशमुख यांनी आरोपींना २२ मेपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या पाच दिवसांत पोलिस वेगवेगळ्या दिशेने तपास करणार असून, हत्या करण्यामागे आरोपींचा नेमका उद्देश काय? यात कोण-कोण गुंतले आहेत, या दिशेने सुद्धा तपासाची चक्र फिरणार आहेत.

-पोलिसांचे जावई

घटनेनंतर दोन तासांतच पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. त्यानंतर दुपारी ४ वाजताच्या सुमारास एका आलिशान कारमधून ‘भाईगिरी’ स्टाइलने पोलिस स्टेशनमध्ये आलेल्या चौघांनी आतमध्ये प्रवेश करीत, आरोपींशी सलगी साधण्याचा प्रयत्न केला. ‘त्या’ चौघांमधील एक पोलिसांचा ‘जावई’ असल्याचे समजते.

Web Title: Dilip Sontakke murder case; 19 injuries and deaths in 29 seconds: Live CCTV footage speaks volumes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.