दिलीप वळसे-पाटील घेणार गृहखात्याचा आढावा; गुरुवारपासून तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2021 21:56 IST2021-10-20T21:55:38+5:302021-10-20T21:56:33+5:30

Nagpur News राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे गुरुवारपासून तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत.

Dilip Walse-Patil to review Home Department; On a three-day Vidarbha tour from Thursday | दिलीप वळसे-पाटील घेणार गृहखात्याचा आढावा; गुरुवारपासून तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर

दिलीप वळसे-पाटील घेणार गृहखात्याचा आढावा; गुरुवारपासून तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर

 

नागपूर : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे गुरुवारपासून तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. पाटील यांचे रात्री नऊ वाजता रवी भवन येथे आगमन होईल. (Dilip Walse-Patil to review Home Department; On a three-day Vidarbha tour from Thursday)

शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता पोलीस जिमखाना येथे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कामकाजाबाबत आढावा बैठक घेतील. याशिवाय सायंकाळी ४.३० वाजता पोलीस जिमखाना येथे नागपूर पोलीस आयुक्त यांच्या कामकाजासंदर्भात आढावा बैठकी घेतील.

गिट्टीखदान पोलीस ठाणे येथे महिला विश्रांती कक्षाचे उद्घाटन, तसेच हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या इमारतीचे कोनशिला अनावरणही त्यांच्या हस्ते होईल. दुपारी १२.३० वाजता प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे नागपूर, पुणे व मुंबई येथील ‘फास्ट ट्रॅक डीएनए युनिट व नागपूर येथील वाईल्डलाईफ डीएनए अनॅलिसिस’ विभागाच्या लोकार्पण सोहळ्यास ते उपस्थित राहतील.

Web Title: Dilip Walse-Patil to review Home Department; On a three-day Vidarbha tour from Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.