संजय गांधी निराधार योजनेतील ६३,२१३ लाभार्थ्यांना थेट अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 21:21 IST2020-10-12T21:19:11+5:302020-10-12T21:21:27+5:30
Sanjay Gandhi Niradhar Yojana, beneficiaries, Nagpur News संजय गांधी निराधार योजनेतील ६३,२१३ लाभार्थ्यांना सुमारे १७ कोटी ४८ लाख ६५ हजार रुपयाचे अनुदान बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी याांनी दिली.

संजय गांधी निराधार योजनेतील ६३,२१३ लाभार्थ्यांना थेट अनुदान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संजय गांधी निराधार योजनेतील ६३,२१३ लाभार्थ्यांना सुमारे १७ कोटी ४८ लाख ६५ हजार रुपयाचे अनुदान बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी याांनी दिली.
विशेष साहाय्य योजनेंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजनाांचा समावेश आहेे. या योजनेंतर्गत शहरातील १ लाख १२ हजार १९२ लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यात येते.
श्रावणबाळ राज्य निवृत्तिवेतन योजना अंतर्गत येणाऱ्या ५४,८२८ लाभार्थ्यांना ८ केटी ५९ लाख ६२ हजार २०० रुपयये, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती योजनेंतर्गत ४,१५१ लाभार्थ्यांना ७२ लाख रुपयाचा निधी शासनाकडून प्राप्त झाला असून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे.