थेट पुनर्मूल्यांकन प्रणाली लागू

By admin | Published: January 6, 2015 12:59 AM2015-01-06T00:59:53+5:302015-01-06T00:59:53+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात यंदाच्या हिवाळी परीक्षांपासून थेट पुनर्मूल्यांकन प्रणालीची सुरुवात करण्यात आली आहे. सुरुवातीला ‘एमई’ व ‘एमटेक’ या अभ्यासक्रमांतील

Direct reassignment system applied | थेट पुनर्मूल्यांकन प्रणाली लागू

थेट पुनर्मूल्यांकन प्रणाली लागू

Next

नागपूर विद्यापीठ : ‘एमई’,‘एमटेक’पासून होणार सुरुवात
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात यंदाच्या हिवाळी परीक्षांपासून थेट पुनर्मूल्यांकन प्रणालीची सुरुवात करण्यात आली आहे. सुरुवातीला ‘एमई’ व ‘एमटेक’ या अभ्यासक्रमांतील विद्यार्थीच थेट पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकणार असल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली आहे. विद्यापीठाने सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पत्र पाठवून याची माहिती दिली आहे.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने या प्रणालीला ‘पायलट प्रोजेक्ट’ म्हणून लागू केले आहे. जर यात यश मिळाले तर उन्हाळी परीक्षांपासून सर्वच अभ्यासक्रमांत थेट पुनर्मूल्यांकन सुविधा लागू करण्यात येईल. यासंदर्भात विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा नियंत्रक प्रशांत मोहिते यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या वृत्तास होकार दिला. यासंदर्भात आमचे प्रयत्न सुरू आहे. सध्या ही बाब प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात येत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रणालीमुळे पुनर्मूल्यांकनाचे निकाल एक ते दीड महिन्याच्या आत लागतील व विद्यार्थ्यांना याचा फायदाच होईल.(प्रतिनिधी)

Web Title: Direct reassignment system applied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.