जशी दिशा तशीच जीवनाची दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 01:17 AM2018-04-07T01:17:49+5:302018-04-07T01:18:05+5:30
जशी दिशा असते तशीच जीवनाची दशा होते, असा संदेश मुनिश्री प्रणामसागरजी यांनी दिला. शुक्रवारी सन्मती भवनात ते श्रावकांना उद्बोधन करीत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जशी दिशा असते तशीच जीवनाची दशा होते, असा संदेश मुनिश्री प्रणामसागरजी यांनी दिला. शुक्रवारी सन्मती भवनात ते श्रावकांना उद्बोधन करीत होते. मुनिश्री पुढे म्हणाले, सूर्यावर सावली आली की सूर्यग्रहण होते. घडीचे तीन काटे एकावर एक आले की १२ वाजतात. याच पद्धतीने जीवनात लहानपण, तरुणपण आणि वृद्धावस्था जीवनाचे १२ वाजवतात. साधू १२ वाजता सामायिक करतात. तीर्थंकराची दिव्यध्वनीही १२ वाजता होते. त्यामुळे १२ ते १२.३० दरम्यान जेवण करू नये. ज्याची राशी मेष असते तो खूप कष्टाळू असतो. मिथून राषी असणारा लक्ष केंद्रित करण्यात कुशल असतो. कर्क राशीवाल्याचा बुद्ध्यांक वेगवान असतो. सिंह राशी वाल्याचा स्वभाव सिंहासारखा असतो. त्याला ताजे अन्न हवे असते. कन्या राशी वाले आॅल राऊंंडर असतात. तुला राशीवाले संतुलन राखतात. वृश्चिक राशीवाल्यांचा स्वभाव विंचवासरखा असतो. धनु राशीवाल्यांचा स्वभाव तरुणसागर असतो. आपल्या नावाचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या उद्बोधनाच्या प्रारंभी मनोज जैन, शशिकांत मुधोळकर, मिलिंद जोहरापूरकर यांनी दीप प्रज्वलन केले. यावेळी डॉ. रिचा जैन, मिलिंद जोहरापूकर, अतुल खेडकर, सुरेश आग्रेकर, पंकज बोहरा, प्रकाश पाटणी, मणीलाल जैन, श्रावक श्रेष्ठी कन्हय्यालाल ढालावत उपस्थित होते. संचालन सतीश पेंढारी जैन यांनी केले.
()