उपविभागीय अधिकाऱ्यांना गावांचे दौरे करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 09:33 PM2019-05-31T21:33:25+5:302019-05-31T21:35:07+5:30

खनिज निधीतून आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सुरु असलेल्या जलसंधारणांच्या कामांमुळे उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे ऑडिट व्हावे तसेच जलसंधारणाची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी ज्या गावांमध्ये कामे सुरु आहेत, त्या गावांचे दौरे करावेत. जलसंधारणाच्या कामांसाठी व जनजागृतीसाठ़ी तालुकास्तरावर प्रशिक्षण शिबिरे आयोजित करावेत, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिले.

Direction to the sub-divisional officers to visit villages | उपविभागीय अधिकाऱ्यांना गावांचे दौरे करण्याचे निर्देश

उपविभागीय अधिकाऱ्यांना गावांचे दौरे करण्याचे निर्देश

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी घेतला जलसंधारण कामांचा आढावा : तालुकास्तरावर घेणार प्रशिक्षण शिबिरे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खनिज निधीतून आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सुरु असलेल्या जलसंधारणांच्या कामांमुळे उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे ऑडिट व्हावे तसेच जलसंधारणाची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी ज्या गावांमध्ये कामे सुरु आहेत, त्या गावांचे दौरे करावेत. जलसंधारणाच्या कामांसाठी व जनजागृतीसाठ़ी तालुकास्तरावर प्रशिक्षण शिबिरे आयोजित करावेत, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिले. भविष्यात एकही गाव पाणीटंचाईचे राहणार नाही, या उद्देशाने ही कामे व्हावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. निधी आहे फक्त कामे गतीने पूर्ण करा, असेही ते म्हणाले.
जलसंधारण, रेन वॉटर हार्वेस्टिग, रिचार्ज शाफ्ट या विषयांच्या कामाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांनी घेतली. या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, जि.प.चे कार्यकारी अभियंता, मजिप्राचे अधिकारी उपस्थित होते. पाणी फाऊंडेशनतर्फे नरखेड तालुक्यात होत असलेले काम चांगले झाले आहे. हे काम करण्यासाठी लोक स्वत:हून पुढे आले आहेत. अशीच कामे जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये व्हावी, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. तसेच खनिज निधी व जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जलसंधारणाच्या होणाऱ्या सर्व कामाचे व्हिडिओ काढण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. नरखेड तालुक्यातील रामठी या गावातील पाण्याची पातळी शोष खड्ड्यामुळे वाढल्याचेही यावेळी सांगण्यात आले. जलसंधारणाची कामे यशस्वी कशी होतील यासाठी पाणी फाऊंडेशनचे राज्यस्तरीय प्रशिक्षक अधिकाऱ्यांना व सरपंच, सचिवांना प्रशिक्षण देतील. यासाठी तालुकानिहाय शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले. या शिबिरांचे यशस्वी आयोजन तहसिलदार आणि बीडीओंनी करावे. या शिबिराचा खर्च रोजगार हमी योजना विभागाने करावा. तसेच रोहयोमार्फत होणाऱ्या कामांतून जलसंधारण साध्य होईल, असा दृष्टिकोन ठेवून ही कामे केली जावीत. ही कामे करताना प्रत्येक तालुक्यात नाल्याचे ग्रीड तयार करा. नाले एकमेकांना जोडले तर पूर येणार नाही व पाणी उपलब्ध राहणार आहे. १३ तालुक्यातील नाले जोडण्यासाठी ग्रीड तयार करण्याच्या सूचनाही पालकमंंत्र्यांनी दिल्या. याच बैठकीत स्थानिक स्तर विभागाच्या अधिकाऱ्यांचे ढेपाळलेले काम पाहता पालकमंत्र्यांनी त्यांच्याकडील काम काढून ते नासुप्रला देण्याचे निर्देश दिले.
‘रिचार्ज शाफ्ट’अंतर्गत जुन्या बोअरवेल, पाण्याचे स्रोत पुन्हा जिवंत करता येऊ शकतात. जीएसडीए हे काम करीत आहे. या कामांसाठी अधिक प्रस्ताव पाठवा. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील १० गावांमधील बंद झालेले पाण्याचे स्रोत रिचार्ज करा. जि.प. सिंचन विभागातर्फे तलावांच्या दुरुस्ती व खोलीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. २५ कोटींची ४७ कामे सुरू आहेत. जिल्हा नियोजन समितीकडून आणखी १७ कोटींची मागणी जि. प. सिंचन विभागाने केली आहे, अशी माहिती या बैठकीतून समोर आली.
महिला बचत गटामार्फत बांबू लागवड करा
रोजगार हमी योजना विभागाने महिलांचे बचत गट तयार करून शासकीय जागेवर बांबू लागवड व एका कुटुंबाला २ झाडे ही योजना राबवावी. रोहयोतून महिलांना २०६ रुपये मजुरी मिळेल व झाडे लागवड होईल. जिल्ह्यातील १३ तालुक्यात ही योजना राबवा. यातून महिला बचत गटाला वर्षभर काम मिळणार आहे.

Web Title: Direction to the sub-divisional officers to visit villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.