शिक्षकाकडून लाच स्वीकारणाऱ्या मुख्याध्यापिकेसह संचालकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 09:25 PM2021-12-15T21:25:43+5:302021-12-15T21:28:33+5:30

Nagpur News शाळेतील शिक्षकाला हजेरी पटावर स्वाक्षरी करू न देता अतिरिक्त होण्याची भीती दाखवीत ६ लाख ५० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापिका आणि त्यांचे पती यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

Director arrested for accepting bribe from teacher | शिक्षकाकडून लाच स्वीकारणाऱ्या मुख्याध्यापिकेसह संचालकास अटक

शिक्षकाकडून लाच स्वीकारणाऱ्या मुख्याध्यापिकेसह संचालकास अटक

Next
ठळक मुद्देखापरखेडा येथे एसीबीची कारवाई साडेसहा लाखांची केली होती मागणी

 

नागपूर : शाळेतील शिक्षकाला हजेरी पटावर स्वाक्षरी करू न देता अतिरिक्त होण्याची भीती दाखवीत ६ लाख ५० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या करंभाड (ता. पारशिवनी) येथील तथागत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शांतशीला भोजराज मेश्राम (४६) आणि त्यांचे पती संस्थेचे सचिव भामराज दौलराव मेश्राम (५७) यांना तक्रारकर्त्याकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

खापरखेडा येथे मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी मध्यरात्री खापरखेडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी बुधवारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करीत एक दिवसाचा पीसीआर एसीबीने मिळविला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पारशिवनी तालुक्यात करंभाड येथे तथागत विद्यालय आहे. ही शाळा संचालित करणाऱ्या संस्थेचे सचिव भामराज दौलतराव मेश्राम हे कोराडी येथील एका शाळेत शिक्षकही आहेत. त्यांची पत्नी शांतशीला भामराज मेश्राम या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. तक्रारदार शिक्षक हा शिक्षक पदावर तथागत विद्यालय येथे कार्यरत आहेत. तक्रारदार यांना आरोपी हे शाळेतील हजेरी पटावर स्वाक्षरी करू देत नव्हते. जानेवारी महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. जानेवारी महिन्यापासूनच ही शाळा ४० टक्के शासकीय अनुदानावर आली. मात्र, गैरहजेरी लावल्याने तक्रारदार अतिरिक्त व अनियमित ठरणार होता.

तो अतिरिक्त व अनियमित ठरू नये यासाठी आरोपींनी तक्रारदाराला ६ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, २० हजार रुपये महिन्याच्या वेतनात ५० हजारांचा हप्ता मुख्याध्यापिका व संस्था सचिवास देणे शिक्षकाला शक्य नव्हते. यामुळे संबंधित शिक्षकाने याबाबत सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. याबाबत एसीबीच्या पथकाने मंगळवारी पडताळणी केली. यानंतर सापळा रचून उपरोक्त कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी मुख्याध्यापिका शांतशीला भामराज मेश्राम व संस्था सचिव भामराज दौलतराव मेश्राम यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करून अटक केली आहे. सदरची कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे, पोलीस हवालदार सुनील कळंबे, नायक पोलीस शिपाई सारंग बालपांडे, सुशील यादव, महिला नायक पोलीस शिपाई बविता कोकडे, गीता चौधरी, करुणा सहारे, वाहनचालक अमोल भक्ते यांच्या पथकाने केली.

Web Title: Director arrested for accepting bribe from teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक