विजय खंडाळ ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालकपदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:10 AM2021-09-21T04:10:01+5:302021-09-21T04:10:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्राला अखेर संचालक मिळाले आहेत. डॉ. विजय खंडाळ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्राला अखेर संचालक मिळाले आहेत. डॉ. विजय खंडाळ यांची ज्ञान स्रोत केंद्राच्या संचालकपदी निवड झाली आहे. दुसरीकडे आंतरशाखीय विद्याशाखेच्या अधिष्ठातापदासाठी कुणाची निवड झाली नाही.
ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालकपदासाठी शनिवारी मुलाखती झाल्या. १६ उमेदवार या शर्यतीत होते. या मुलाखतीदरम्यान उमेदवारांच्या सादरीकरणाच्या आधारावर निवड समितीने निर्णय घेतला व खंडाळ यांची निवड झाली. डॉ. विजय खंडाळ १९९७ साली विद्यापीठ विद्यार्थी संघाचे अध्यक्ष होते. त्यानंतर एम.लिब करत त्यांनी आचार्य पदवी मिळविली. त्यांना ग्रंथपाल म्हणून अनुभव आहे. संगणकीय तंत्रज्ञानाचा उपयोग करून ग्रंथालयांना अत्याधुनिक स्वरूप देण्यात त्यांना चांगला अनुभव आहे.
शनिवारीच आंतरशाखीय विद्याशाखेच्या अधिष्ठातापदासाठी मुलाखती झाल्या. या मुलाखतींना तीन उमेदवार आले होते. मात्र एकही उमेदवार पात्र नसल्याचा शेरा निवड समितीने दिला. याअगोदरदेखील या पदासाठीच्या मुलाखती रद्द झाल्या होत्या. आता एकही उमेदवार पात्र न आढळल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.