काेराेना वाॅर्डाच्या टाॅयलेटच्या टाइल्समधून निघते घाण पाणी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:08 AM2021-03-06T04:08:03+5:302021-03-06T04:08:03+5:30
या वाॅर्डात आलेल्या एका रुग्णाच्या कुटुंबीयांनी येथील परिस्थितीचे छायाचित्र शेअर केले आहे. काेराेना वाॅर्ड क्रमांक ४१ मधील ही परिस्थिती ...
या वाॅर्डात आलेल्या एका रुग्णाच्या कुटुंबीयांनी येथील परिस्थितीचे छायाचित्र शेअर केले आहे. काेराेना वाॅर्ड क्रमांक ४१ मधील ही परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. शाैचालयाच्या समाेरच असलेली टाइल्स घाण पाण्याने काळी पडली आहे आणि टाइल्सखाली घाण पाणी जमा असल्याचे दिसून येत आहे. आपल्या फाेनवर बाेलतानाही हात धुण्याचा सल्ला दिला जात असताना उपराजधानीच्या या माेठ्या रुग्णालयातील काेराेना वाॅर्डात स्वच्छतेबाबत हा निष्काळजीपणा का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. साफसफाई नियमित हाेणे गरजेचे असताना हे दृश्य पाहिल्यावर येथे अनेक दिवसांपासून स्वच्छता झाली नसल्याचे आणि देखभाल दुरुस्ती झाली नसल्याचे लक्षात येते. हे जमा असलेले दूषित पाणी व अस्वच्छतेचे दुष्परिणाम रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना भाेगावे लागण्याची शक्यता आहे. जबाबदार अधिकाऱ्यांकडून रुग्णांच्या उपयाेगात येणाऱ्या या जागांचेही निरीक्षण हाेणे गरजेचे असल्याचे आवाहन नातेवाईकांनी केले.