स्लम सोबतच पॉश वस्त्यात घाण पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:07 AM2021-07-16T04:07:39+5:302021-07-16T04:07:39+5:30

सिवरेजमुळे विहिरींचे पाणी दूषित : : पाणी पुरवठ्यावरील भार वाढला लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मागील ४०-५० वर्षात उपराजधानीचा ...

Dirty water in posh neighborhood along with slum! | स्लम सोबतच पॉश वस्त्यात घाण पाणी!

स्लम सोबतच पॉश वस्त्यात घाण पाणी!

Next

सिवरेजमुळे विहिरींचे पाणी दूषित : : पाणी पुरवठ्यावरील भार वाढला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मागील ४०-५० वर्षात उपराजधानीचा लूक बदलला आहे. शहरातील रस्ते चकाचक होत आहेत. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यामुळे यात भर पडली आहे. दुसरीकडे वाढत्या लोकसंख्येचा भार नागरी सुविधा सोबतच गतकाळातील सिवरेज लाईनवर आला आहे. परंतु ब्रिटिशकालीन ट्रंक लाईन दुरुस्ती व कमी क्षमतेच्या सिवरेज लाईन वर्षानुवर्ष बदलण्यात आलेल्या नाहीत. यामुळे सिवरेज लाईन नादुरुस्त झाल्याने स्लम भागासोबतच पॉश वस्त्यातील घराघरात घाण पाण्याचा त्रास वाढला आहे.

प्रस्तावित ११५० कोटींच्या साऊथ झोन सिवरेज प्रकल्प लक्ष्मीनगर, हनुमाननगर, धंतोली व नेहरूननगर या चार झोनमध्ये राबविला जाणार आहे. यात प्रामुख्याने दक्षिण नागपूर, दक्षिण-पश्चिम नागपूर भागातील वस्त्यांचा समावेश आहे. मात्र सरकार दरबारी हा प्रकल्प रखडला असल्याने चारही झोन मधील नागरिक सिवरेजमुळे त्रस्त आहेत.

गेल्या आठवड्यात गुरुवारी आलेल्या जोराच्या पावसामुळे सिवरेज तुंबल्याने विश्वकर्मानगर भागातील नागरिकांच्या घरात सिवरेजचे पाणी साचले. अनेकांच्या घरात अजूनही घाण पाणी साचून आहे. अशीच अवस्था रामेश्वरी भागातील वस्त्यांची झाली. नागरिकांनी मनपा आयुक्तांकडे तक्रार केली. ही समस्या या दोन वस्त्यांचीच नाही तर दक्षिण नागपुरातील नवीन सुभेदार, आदर्श कॉलनी , अयोध्यानगर, दुर्गानगर, मानेवाडा, हसनबाग, दिघोरी गाव, ताजबाग, म्हाळगीनगर, छोटा ताजबाग, रघुजीनगर, कामगार कॉलनी, सर्वश्रीनगर, नरसाळा रोड, बॅनर्जी ले-आऊट, कामगार कॉलनी अशा वस्त्यांचा समावेश आहे.

कमी अधिक प्रमाणात नागरिक त्रस्त आहेत.

पूर्व नागपुरातील हसनबाग, नंदनवन, नवीन नंदनवन, कीर्तीनगर, दर्शन कॉलनी, पारडी, डिप्टी सिग्नल, हिवरीनगर, वाठोडा, वैभव नगर, गरोबा मैदान, मध्य नागपुरातील तेलीपुरा, बगडगंज, कुंभार टोली ,खरबी रोड यासह अन्य वस्त्यातही सिवरेज लाईनची समस्या आहे.

...

पॉश वस्त्यातही समस्या

दक्षिण-पश्चिम नागपुरातील प्रतापनगर, त्रिमूर्ती नगर , नरेंद्र नगर, सोमलवाडा, जोशी नगर, शिवणगाव, अजनी, कर्वे नगर, मनीष नगर, राजीव नगर, गोपाल नगर अशा पॉश वस्त्यातही सिवरेज लिकेज व नादुरुस्त असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

....

जुन्या वस्त्यातही समस्या

महाल, मोमीनपुरा, जुनी मंगळवारी, लालगंज, सतरंजीपुरा, सदर, तेलीपुरा, बगडगंज, मेकोसाबाग, हंसापुरी, किल्ला रोड, चिटणवीसपुरा, बोरीयापुरा, टिमकी नाईक तलाव यासह अन्य वस्त्यातही सिवरेज लाईन मोठ्या प्रमाणात नादुरुस्त आहेत.

....

विहिरीचे पाणी दूषित

सिवरेज लाईन नादुरुस्त व लिकेज असल्याने भूगर्भातील पाणी प्रदूषित झाले आहे. यामुळे विहिरींच्या पाण्याचा वापर करता येत नाही. वेळप्रसंगी नळाला पुरेसे पाणी न आल्यास विहिरींच्या पाण्याचा वापर करता येत नाही. यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेवर भार वाढला आहे.

Web Title: Dirty water in posh neighborhood along with slum!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.