दिव्यांग कर्णबधीर मुलींना मिळणार हक्काचे वसतिगृह 

By गणेश हुड | Published: August 18, 2023 02:48 PM2023-08-18T14:48:23+5:302023-08-18T14:49:22+5:30

दिव्यांग कर्णबधीर मुलींच्या वसतिगृहाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन

Disabled and deaf girls will get the right hostel | दिव्यांग कर्णबधीर मुलींना मिळणार हक्काचे वसतिगृह 

दिव्यांग कर्णबधीर मुलींना मिळणार हक्काचे वसतिगृह 

googlenewsNext

नागपूर : जिल्ह्यातील दुर्गम भागातील दिव्यांग कर्णबधीर शाळेतील मुलींना वसतिगृहाची पक्की इमारत नव्हती, आता त्यांना सर्व सोईनीयुक्त अशी हक्काची इमारत मिळेल. त्यामुळे त्यांच्या गुणवत्तेत निश्चितच वाढ होणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी सांगितले.

दिव्यांग कर्णबधीर मुलींच्या वसतिगृहाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. एम.एल. पेंडसे फॉऊंडेशन मुंबईचे विश्वस्त ॲड शशांक मनोहर, वर्षा मनोहर, सत्यनारायण भारतिया, जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर, शाळेच्या प्राचार्या डॉ. सांगोळे यावेळी उपस्थित होत्या. जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी मुलींच्या वसतिगृहाच्या शाळेचे भूमीपूजन केले.

दिव्यांगासाठी नागपुरातील एकमेव शाळा अशी जूनी ख्याती असलेल्या या शाळेमुळे दिव्यांग मुलींच्या सूप्त गुणांना वाव मिळेल. सोबतच त्यांचे जीवन सुकर होईल, असे शर्मा म्हणाल्या. सामाजिक कार्याच्या जाणिवेतून हे कार्य करीत असल्याचे शशांक मनोहर यांनी सांगितले. आपल्याला समाजाचं काही देणं असते, त्यातूनच ही परतफेड आहे. दिव्यांगाच्या मदतीसाठी आपण सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. सांगोळे यांनी तर संचालन व आभार शिक्षिका उत्तरा पटवर्धन यांनी मानले.

Web Title: Disabled and deaf girls will get the right hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.