दिव्यांग बालकांना कुटुंबाचा पाठिंबा आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:12 AM2021-02-23T04:12:01+5:302021-02-23T04:12:01+5:30
- सुचेता आणि श्रीकांत बनसोड यांचे मत नागपूर : कर्णबधिर बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्याच्या वयानुरूप विकास साधण्यासाठी ...
- सुचेता आणि श्रीकांत बनसोड यांचे मत
नागपूर : कर्णबधिर बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्याच्या वयानुरूप विकास साधण्यासाठी त्यांना कुटुंबाचा, विशेषत: आई-वडिलांचा पाठिंबा आवश्यक असतो, असे मत सुचेता आणि श्रीकांत बनसोड यांनी व्यक्त केले. ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सेवा गाथा या कार्यक्रमात हे दाम्पत्य बोलत होते.
या मुलांचा बुद्ध्यांक सामान्य मुलांसारखाच आणि क्वचित जास्त चांगला असतो. त्यामुळे, बाळासोबत त्याच्या आईच्या प्रशिक्षणालाही विशेष महत्त्व आहे. कुटुंबासोबत या विशेष बालकांचा विशेष अनुबंध असायला हवा. तंत्रज्ञान केवळ त्याच्यापर्यंत आवाज पोहचविण्यासाठी सहाय्यभूत ठरते मात्र, इतर संपूर्ण विकास स्नेहबंधातूनच साधतो, बनसोड दाम्पत्य म्हणाले. अकोल्याचे सुचेता आणि श्रीकांत बनसोड यांनी, आपल्या मुलासोबत जे झाले ते इतरांच्या बाबतीत होऊ नये म्हणून या जोडप्याने १४ वर्षांपूर्वी कर्णबधिर आणि मूकबधिर मुलांसाठी बाल विकास केंद्र सुरू केले. या मुलांना बोलते करत, त्यांना मुख्य प्रवाहात आणून सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगण्याची नवीन उमेद निर्माण करण्याचा अथक प्रयत्न त्यांनी चिकाटीने सुरू ठेवला. त्यांच्या या कार्याची दखल घेत, त्यांना राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले. सामान्य शाळेतून शिक्षण मिळण्यासाठी लागणारी पूर्वतयारी बालविकास केंद्रात करून घेतली जाते. त्यांच्या या प्रेरणादायी जीवनाचा प्रवास या कार्यक्रमातून उलगडला.