शहरापेक्षा ग्रामीणमध्ये बाधित, मृत्युसंख्या जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:08 AM2021-05-20T04:08:02+5:302021-05-20T04:08:02+5:30

नागपूर : बुधवारी जिल्ह्यामध्ये नव्या कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याचे दिसून आले. जिल्ह्यामध्ये २४ तासांमध्ये एक हजार ३७७ नवे बाधित आढळले. ...

Disadvantaged in rural than urban, higher mortality | शहरापेक्षा ग्रामीणमध्ये बाधित, मृत्युसंख्या जास्त

शहरापेक्षा ग्रामीणमध्ये बाधित, मृत्युसंख्या जास्त

Next

नागपूर : बुधवारी जिल्ह्यामध्ये नव्या कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याचे दिसून आले. जिल्ह्यामध्ये २४ तासांमध्ये एक हजार ३७७ नवे बाधित आढळले. शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जैसे थे असली तरी ग्रामीण भागात वाढ झाली असून, ही बाब चिंताजनक आहे. दिवसभरात ३६ रुग्णांचा मृत्यू झाला व त्यातही ग्रामीणमधील मृतांची संख्या जास्त आहे.

बुधवारच्या अहवालानुसार नागपूर शहरात ५९१, तर ग्रामीणमध्ये ७७४ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात शहरामध्ये ११, ग्रामीण भागात १३ तर जिल्ह्याबाहेरील १२ रुग्णांचा मृत्यू झाला. २४ तासांत जिल्ह्यामध्ये २० हजार ३६ चाचण्या झाल्या. यात शहरामधील १४ हजार ७४५, तर ग्रामीणमधील पाच हजार २९१ चाचण्यांचा समावेश होता. शहरात पॉझिटिव्हिटीची टक्केवारी ४.०१ टक्के इतकी होती, तर ग्रामीणमध्ये हा आकडा १४.६३ टक्के इतका होता. ग्रामीणच्या पॉझिटिव्हिटी टक्केवारीत दिवसभरात ४.७८ टक्क्यांनी वाढ झाली.

पावणेचार हजार रुग्ण ठीक

२४ तासांत जिल्ह्यामध्ये तीन हजार ७७८ रुग्ण बरे झाले. सातत्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या बाधितांपेक्षा जास्त आहे ही दिलासा देणारी बाब आहे. जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख ३६ हजार ५९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. कोरोनावर मात करण्याऱ्या रुग्णांची टक्केवारी ९३.५३ टक्के इतकी झाली आहे.

सक्रिय रुग्णसंख्या २१ हजारांच्या घरात

काही दिवसांअगोदर जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या ६० हजारांहून अधिक झाली होती. परंतु आता रुग्ण कमी होत असून, सक्रिय रुग्णसंख्या २१ हजार ५२८वर पोहोचली आहे. यात शहरांतील दहा हजार ८४७, तर ग्रामीणमधील दहा हजार ६८१ जणांचा समावेश आहे. विविध रुग्णालयांत पाच हजार ७४ रुग्ण उपचार घेत असून, १५ हजार ८०४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

कोरोनाची आकडेवारी

नवे बाधित - ५९१ (शहर) - ७७४ (ग्रामीण)- १२ (जिल्ह्याबाहेरील)

मृत्यू - ११ (शहर) - १३ (ग्रामीण) - १२ (जिल्ह्याबाहेरील)

कोरोनामुक्त - १,६११ (शहर)- २,१६७ (ग्रामीण)

चाचण्या - १४,७४५ (शहर) - ५,२९१ (ग्रामीण)

एकूण बाधित रुग्ण : ४,६६,७८०

एकूण मृत्यू : ८,६५७

एकूण कोरोनामुक्त : ४,३६,५९५

Web Title: Disadvantaged in rural than urban, higher mortality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.