मरु नदीच्या पात्रात आपत्ती व्यवस्थानाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:10 AM2021-09-21T04:10:15+5:302021-09-21T04:10:15+5:30
भिवापूर : अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर वेळीच मात करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे कौशल्य असणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य राखीव पोलीस ...
भिवापूर : अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर वेळीच मात करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे कौशल्य असणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य राखीव पोलीस बलाच्या मार्गदर्शनात सोमवारी मरु नदीच्या विस्तीर्ण पात्रात आपत्ती व्यवस्थानाचे धडे गिरविल्या गेले. यावेळी महसूल विभाग, पोलीस व होमगार्ड बांधव सहभागी झाले होते.
तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ४ यांच्या नेतृत्वात सहायक समादेशक प्रमोद लोखंडे, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस उपनिरीक्षक डी. एन. मंडल यांच्यासह एस. यू. सिरसाट, एस. ए. काळे, वाय. डी. चापले, वाय. एम. सोळंके, के. एन. बावणे, जे. टी. शेख, पी. एम. पाटील यांच्या चमूने नदीच्या पात्रात चित्तथरारक प्रात्यक्षिके केली. स्थानिक पोलीस कर्मचारी व होमगार्ड सैनिकांनीसुद्धा या प्रात्यक्षिकांचे धडे गिरविले. यावेळी सहायक निरीक्षक शरद भस्मे, उपनिरीक्षक प्रकाश चंगोले, राजेंद्र डहाके, भगवानदास यादव, विनोद झाडे, राजू सेलोकर, गोकुळ सलामे, दीपक जाधव, प्रशांत आंभोरे, उमेश नाकाडे, अतुल सुपारे, अमोल कठाणे, शुभम मोहिते, प्रमोद गोजे, नीतेश भोगे, निखील भोगे, सारंग राखडे, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल आदी उपस्थित होते.
200921\img-20210920-wa0101.jpg
मरू नदीच्या पाञात प्रात्यक्षिके करतांना आपत्ती व्यवस्थापनाचे पथक