'नोटा'वरून सेव्ह मेरिट सेव्ह नेशनमध्ये फूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 11:59 PM2019-10-14T23:59:11+5:302019-10-15T00:00:43+5:30

सेव्ह मेरिट सेव्ह नेशन ही शैक्षणिक चळवळ असून, विविध जातीधर्मातील गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शिक्षणात आरक्षण मिळावे, यासाठी ही चळवळ सुरू केली आहे. त्याचा राजकारणाशी किंवा कुठल्याही निवडणुकीशी संबंध नाही, असे स्पष्टीकरण या चळवळीत सहभागी झालेल्या काही संघटनांनी दिले आहे.

Disband in Save Merit Save Nation on 'Nota' | 'नोटा'वरून सेव्ह मेरिट सेव्ह नेशनमध्ये फूट

'नोटा'वरून सेव्ह मेरिट सेव्ह नेशनमध्ये फूट

Next
ठळक मुद्दे‘नोटा’चा वापर करू नका : विवेकाने मतदान करा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सेव्ह मेरिट सेव्ह नेशन ही शैक्षणिक चळवळ असून, विविध जातीधर्मातील गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शिक्षणात आरक्षण मिळावे, यासाठी ही चळवळ सुरू केली आहे. त्याचा राजकारणाशी किंवा कुठल्याही निवडणुकीशी संबंध नाही, असे स्पष्टीकरण या चळवळीत सहभागी झालेल्या काही संघटनांनी दिले आहे.
दरम्यान, याच चळवळीतील सेव्ह मेरिट सेव्ह नेशनचे अध्यक्ष डॉ. अनिल लद्दड यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करून विधानसभा निवडणुकीत कुठल्याही पक्षाला मतदान न करता नोटाचा वापर करण्याचे आवाहन केले होते. परंतु त्यांचे हे आवाहन धुडकावीत याच चळवळीतील काही संघटनांनी लद्दड यांच्या आवाहनाला विरोध केला आहे. डॉ. संजय देशपांडे, सचिन पोशट्टीवार, अनुप मरार, अविनाश साहू, रॉय थॉमस यांनी सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात डॉ. लद्दड यांच्या या फतव्याशी आमचा कुठलाही संबंध नाही, असे स्पष्टपणे म्हटले आहे. निवडणुकीत मतदाराला मतदान करण्याचा हक्क आहे. मग त्याने कुठल्याही पक्षाला केले तरी चालेल. मात्र सरसकट नोटाचा वापर करा, असे म्हणणे हे केवळ चुकीचेच नसून शैक्षणिक चळवळीला राजकारणाच्या दावणीला बांधण्याचा हा प्रकार आहे.
दरम्यान, येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये नोटाचा वापर न करता सद्सद्विवेकबुद्धीने मतदान करावे आणि लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहनही या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
या चळवळीचा राजकारणाशी किंवा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. या चळवळीत विविध जातीधर्मातील माणसे सहभागी आहेत. सरकारने आरक्षण देताना किंवा शैक्षणिक संस्थेत प्रवेश देताना केवळ गुणवत्तेलाच प्राधान्य देण्यात यावे, यासाठी ही चळवळ सुरू केली आहे. मात्र काही जण या चळवळीचा उपयोग राजकीय अजेंडा म्हणूृन करीत आहेत. त्यामुळे आमच्या या भूमिकेला या संघटनेतील अनेकांनी पाठिंबा दिला आहे.
सर्व संघटनांनी अशा कुठल्याही फतव्यांना बळी पडू नये, असे आवाहन करीत असताना या चळवळीच्या लेटरपॅड आणि लोगोचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Web Title: Disband in Save Merit Save Nation on 'Nota'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.