पदाधिकाऱ्यांची मर्जी; ३० टक्के अधिकारी ठाण मांडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:10 AM2021-08-24T04:10:49+5:302021-08-24T04:10:49+5:30

मनपात वित्त विभागाला पसंती : मालमत्ता विभागातील कर्मचारी दुसऱ्या विभागात लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेत विविध विभागात ...

Discretion of office bearers; 30 per cent officers stationed | पदाधिकाऱ्यांची मर्जी; ३० टक्के अधिकारी ठाण मांडून

पदाधिकाऱ्यांची मर्जी; ३० टक्के अधिकारी ठाण मांडून

Next

मनपात वित्त विभागाला पसंती : मालमत्ता विभागातील कर्मचारी दुसऱ्या विभागात

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेत विविध विभागात महत्त्वाच्या टेबलांवर पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतील ३० टक्के कर्मचारी व अधिकारी मागील आठ-दहा वर्षांपासून ठाण मांडून आहेत. पदाधिकाऱ्यांची मर्जी सांभाळण्यातच धन्यता मानत असल्याने उत्पन्नासोबतच प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाला आहे.

मनपाचा आर्थिक व्यवहार सांभाळणारा वित्त विभाग, प्रमुख आर्थिक स्त्रोत असलेला मालमत्त कर व नगररचना विभागात काही अधिकारी व कर्मचारी मागील १० ते १५ वर्षांपासून एकाच टेबलावर ठाण मांडून आहेत. अर्थातच त्यांची मक्तेदारी निर्माण झाली आहे. झोनस्तरावर यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. वास्तविक तीन वर्षांनी रोटेशननुसार कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बदल्या होणे अपेक्षित आहेत; परंतु नियम डावलून हा प्रकार सुरू आहे.

..........

काहींना पदोन्नती, काही वेटिंगवर

महापालिकेत पदाधिकारी व अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली जाते. दोन महिन्यांपूर्वी काहींना पदोन्नती दिली. तर पदोन्नतीसाठी पात्र असूनही काहींना वेटिंगवर ठेवण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाने पात्र असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना सर्वांना पदोन्नती द्यावी, अशी कर्मचारी संघटनेची मागणी आहे.

Web Title: Discretion of office bearers; 30 per cent officers stationed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.