पदाधिकाऱ्यांची मर्जी; ३० टक्के कर्मचारी ठाण मांडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:10 AM2021-08-24T04:10:44+5:302021-08-24T04:10:44+5:30

पदाधिकाऱ्यांची मर्जी; ३० टक्के कर्मचारी ठाण मांडून पदाधिकाऱ्यांची मर्जी; ३० टक्के कर्मचारी ठाण मांडून, आस्थापना सोडून सोयीनुसार काम मनपा ...

Discretion of office bearers; 30% of the employees are stationed | पदाधिकाऱ्यांची मर्जी; ३० टक्के कर्मचारी ठाण मांडून

पदाधिकाऱ्यांची मर्जी; ३० टक्के कर्मचारी ठाण मांडून

Next

पदाधिकाऱ्यांची मर्जी; ३० टक्के कर्मचारी ठाण मांडून

पदाधिकाऱ्यांची मर्जी; ३० टक्के कर्मचारी ठाण मांडून, आस्थापना सोडून सोयीनुसार काम

मनपा आस्थापनेनुसार कर्मचारी, अधिकारी व शिक्षकांची १५ हजार ९२८ पदे मंजूर आहेत. यातील ९,८३३ पदावर कर्मचारी कार्यरत असून, ६,३८१ पदे रिक्त आहेत. मागील काही महिन्यात २८० कर्मचारी व अधिकारी सेवानिवृत्त झाले, याचा विचार करता रिक्त पदाची संख्या अधिक आहे. त्यात मूळ आस्थापनेत रिक्त पदे असूनही त्या विभागात काम न करता दुसऱ्या विभागात काम करणाऱ्यांची संख्या ३० टक्क्याहून अधिक आहे. मनपाचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर विभागातील ११० कर्मचारी दुसऱ्या विभागात काम करतात. याचा कर वसुलीवर परिणाम होत असूनही पदाधिकारी यावर गंभीर नाहीत.

...

कशी होणार कर वसुली?

मनपाचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर विभागात ४५० पदे मंजूर आहेत. यातील ३३२ कार्यरत आहेत. परंतु ११० कर्मचारी दुसऱ्या विभागात काम करतात. वेतन मात्र या विभागातून उचलतात. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने कर वसुली कशी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

...

मनपातील मंजूर,कार्यरत व रिक्त पदे

वर्ग मंजूर पदे कार्यरत रिक्त पदे

वर्ग - १ १९९ १०३ ९६

वर्ग-२ ७७ २३ ५४

वर्ग-३ ३७९१ १७५४ २०३४

शिक्षक

(संच मान्यतेनुसार)७५५ १०४१ ...

वर्ग-४ २७५४ ८९७ १८५७

सफाई मजूर ४४०७ २१४९ २२२५८

(मागील काही महिन्यात सेवानिवृत्त २८० कर्मचारी यांचा यात समावेश नाही.)

...

Web Title: Discretion of office bearers; 30% of the employees are stationed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.