आरक्षणावर पावसाळी अधिवेशनात चर्चा करा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:07 AM2021-06-26T04:07:06+5:302021-06-26T04:07:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अनुसूचित जातीच्या पदाेन्नतीतील आरक्षण व ओबीसीचे राजकीय आरक्षण यासंदर्भात लवकरच सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनुसूचित जातीच्या पदाेन्नतीतील आरक्षण व ओबीसीचे राजकीय आरक्षण यासंदर्भात लवकरच सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात चर्चा करावी, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संस्थापिका सुलेखा कुंभारे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी शुक्रवारी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदनही सादर केले आहे.
आरक्षणासाठी आघाडी शासनातील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनुसूचित जाती व बहुजन समाजातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन लढा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. शिष्टमंडळात नगरसेविका व धंतोली झोनच्या सभापती वंदना भगत, भीमराव फुसे, वीरेंद्र शाहू, विजय दहीकर, अजय कदम, संदीप कांबळे, आनंद नाईक, चंद्रमणी पानतावणे, दीपक सिरिया, अफजल अन्सारी, अशफाक कुरैशी, रत्नमााला मेश्राम, जया पानतावणे, रेखा भावे, रजनी लिंगायत, सावला सिंगाडे, भरत जवादे, अशोक नगरारे, महेंद्र थूल, नरेंद्र चव्हण आदी प्रामुख्याने उपस्थित हाेते.