इंडियन रोड काँग्रेसच्या अधिवेशनात रस्ता सुरक्षेवर मंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:30 AM2018-11-21T00:30:52+5:302018-11-21T00:32:34+5:30
भारतीय रस्ता महासभेचे (इंडियन रोड काँग्रेस-आयआरसी) ७९ वे वार्षिक अधिवेशन नागपुरात २२ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात रस्ता सुरक्षा या महत्वाच्या विषयावर मंथन होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय रस्ता महासभेचे (इंडियन रोड काँग्रेस-आयआरसी) ७९ वे वार्षिक अधिवेशन नागपुरात २२ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात रस्ता सुरक्षा या महत्वाच्या विषयावर मंथन होणार आहे.
आयआरसी ही प्रमुख तांत्रिक स्वायत्त संस्था आहे. १९३४ साली त्यावेळच्या भारत सरकारने देशातील रस्ते विकास या मुख्य उद्देशाने या संस्थेची स्थापना केलेली आहे. सध्याच्या परिस्थितीत देशातील वाढते अपघात विचारात घेता रस्ता सुरक्षा हा महत्त्वाचा विषय आहे. नागपूर अधिवेशनाचा हा एक प्रमुख भाग आहे. अपघाताची संख्या विचारात घेता रस्ते वाहतुकीत सुरक्षा या प्रश्नाकडे गांभीर्याने बघण्याची आज गरज आहे. यादृष्टीने या अधिवेशनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
रस्ते अपघातासंदर्भात महत्वाच्या बाबी
- भारतात रस्ता अपघातात दरवर्षी १.३७ लाख ते १. ५० लाख व्यक्तींचे बळी जातात.
- भारतात प्रत्येक ४ मिनिटाला एक व्यक्ती मृत्युमुखी पडते.
- भारतात प्रत्येक दिवशी १४ वर्ष वयोगटातील २० बालकांचा मृत्यू होतो.
- भारतात प्रत्येक मिनिटाला एक गंभीर अपघात होतो.
- भारतात सर्वसाधारणपणे २५ टक्के पेक्षा जास्त मृत्युमुखी पडणारे दुचाकी अपघातामुळे आहेत.
- भारतात सर्वसाधारणपणे ३७७ व्यक्ती दररोज अपघातात बळी पडतात.