२६ फेब्रुवारीपासून नागपुरात होणार ब्रह्मांडावर मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 10:43 PM2018-02-20T22:43:45+5:302018-02-20T22:49:06+5:30

‘सिरी’ (सेंट्रल इंडिया रिसर्च इन्स्टिट्यूट) व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने खगोलशास्त्रासंदर्भात आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. २६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत होणाऱ्या या संमेलनाला देशविदेशातील नामांकित शास्त्रज्ञ व संशोधक उपस्थित राहणार आहेत.

Discussion on the Universe will take place since February 26 in Nagpur | २६ फेब्रुवारीपासून नागपुरात होणार ब्रह्मांडावर मंथन

२६ फेब्रुवारीपासून नागपुरात होणार ब्रह्मांडावर मंथन

googlenewsNext
ठळक मुद्देखगोलशास्त्र संमेलनाचे आयोजन : देशविदेशातील संशोधक उलगडणार भौतिक विश्वाचे अंतरंग

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : ‘सिरी’ (सेंट्रल इंडिया रिसर्च इन्स्टिट्यूट) व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने खगोलशास्त्रासंदर्भात आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. २६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत होणाऱ्या या संमेलनाला देशविदेशातील नामांकित शास्त्रज्ञ व संशोधक उपस्थित राहणार आहेत. यात डॉ.जयंत नारळीकर यांचादेखील समावेश असेल, अशी माहिती ‘सिरी’चे अध्यक्ष आ.अनिल सोले यांनी दिली.
२६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मुरलीधर चांदेकर, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कल्याणकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन होईल. २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात डॉ.जयंत नारळीकर हे विश्वाचे कोडे आपल्याला कितपत उलगडले आहे, या विषयावर व्याख्यान देतील.
सोबतच या संमेलनात जर्मनीच्या ‘मॅक्स प्लांक’ संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. गेयुंग चॉन, डॉ. हान्स बोरिंजर व चीनच्या ‘बिजिंग आॅब्सर्वेटरी’चे डॉ जिनलिन हान हे ‘गॅलेक्सी’च्या, दीर्घिका यांच्या निरीक्षणावर प्रकाश टाकतील. पुण्याच्या ‘आयुका’ संस्थेचे संशोधक डॉ.अजित केवाभी, अमेरिकेतील ओहायो विद्यापीठाचे डॉ.समीर माथुर, पॅरिस विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ.मार्टिन बुचर, मेक्सिको येथील डॉ.ओविजिक्स, मुंबईच्या ‘टीआयएफआर’चे डॉ.उन्नीकृष्णन, जपानच्या टोकियो विद्यापीठाचे संशोधक डॉ.युटो मिनामी, दक्षिण अफ्रिकेतील क्वाझुलु-नाताळ विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ.डेविन क्रिच्टन, डॉ.सुनील महाराज, इंग्लंडच्या हर्टफोर्डशायर विद्यापीठातील डॉ.मार्टिनी क्राऊस, दिल्ली विद्यापीठातील डॉ.पैत्रिक दासगुप्ता, कोलकाताचे डॉ.नारायण बॅनर्जी, बेंगळुरु येथील भारतीय खगोल भौतिकी संस्थेतील डॉ.राम सागर, ‘इस्त्रो’च्या ‘स्पेस अप्लिकेशन सेंटर’चे डॉ.रतनसिंह बिश्त इत्यादी तज्ज्ञ या संमेलनात सहभागी होणार आहेत, असे आ.सोले यांनी सांगितले. यावेळी संयोजक डॉ.संजय वाघ, डॉ.दिलीप देशपांडे, प्रा.राजेश बागडी, अभय कोलारकर प्रामुख्याने सहभागी होते.

Web Title: Discussion on the Universe will take place since February 26 in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.