सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी काही कंपन्यांशी चर्चा; देवेंद्र फडणवीसांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 09:06 AM2024-07-07T09:06:56+5:302024-07-07T09:07:04+5:30

बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमधील जपानस्थित होरिबा कंपनीच्या सुविधा केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण

Discussions with some companies for semiconductor projects says Devendra Fadnavis | सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी काही कंपन्यांशी चर्चा; देवेंद्र फडणवीसांची माहिती

सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी काही कंपन्यांशी चर्चा; देवेंद्र फडणवीसांची माहिती

नागपूर : राज्यात सेमीकंडक्टरचा प्रकल्प यावा, यासाठी काही कंपन्यांसोबत चर्चा सुरू आहे. जपान येथील होरिबा कंपनीने वैद्यकीय उपकरण आणि कंज्युमेबल्स उत्पादन प्रकल्प वेगाने सुरू केला. त्यामुळे त्यांनीच आता सेमीकंडक्टरचा प्रकल्प सुरू करावा. त्यासाठी राज्य सरकार सहकार्य करेल, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  
 
बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमधील जपानस्थित होरिबा कंपनीच्या सुविधा केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. फडणवीस म्हणाले, बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमध्ये २०० कोटींच्या गुंतवणुकीतून उभारलेल्या प्रकल्पामुळे भारतातील ३० हजार डायग्नॉस्टिक लॅब यांना अत्यावश्यक महत्त्वाची उपकरणे पुरविली जातील. 

Web Title: Discussions with some companies for semiconductor projects says Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.