एकीकडे मोसंबी गळती दुसरीकडे सोयाबीनवर रोगांचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 11:42 AM2020-09-04T11:42:04+5:302020-09-04T11:42:28+5:30

काटोल नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित करणारी मोसंबी व सोयाबीन दोन्ही नगदी पिके हातातून गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून आता पुढे काय या विवंचनेत आहे.

Disease outbreak on soybeans on the one hand; Farmers nervous | एकीकडे मोसंबी गळती दुसरीकडे सोयाबीनवर रोगांचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंताग्रस्त

एकीकडे मोसंबी गळती दुसरीकडे सोयाबीनवर रोगांचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंताग्रस्त

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: काटोल नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित करणारी मोसंबी व सोयाबीन दोन्ही नगदी पिके हातातून गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून आता पुढे काय या विवंचनेत आहे. या नैसर्गिक आपत्तीत शासनाकडून हेक्टरी कमीत कमी एक लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून मदत जाहीर करावी अशी मागणी होत आहे. 

काटोल नरखेड तालुक्यातील अंदाजे तीस हजार हेक्टर क्षेत्रावर निंबुवर्गीय संत्रा मोसंबीच्या फळबागा असुन नेहमी या पिकांना नगदी पीक म्हणून गणल्या जाते. परंतु सध्या काही विशिष्ट रोगांचे थैमान सुरू झाल्याने मोसंबी फळांची मोठ्या प्रमाणात गळती होताना दिसत आहे. यावर कुठल्याही प्रकारचे औषध काम करतनसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

येलो मोझॅक विषाणूंचा प्रादुर्भाव व बुरशीजन्य रोगाच्या प्रादुभार्वामुळे हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन पिकानेसुद्धा दगा दिला आहे. या संदर्भात पाहणी करण्यासाठी उद्यानविद्यावेत्ता, किटकशास्त्रज्ञ, सहयोगी अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई, कृषी अधिक्षक डॉ मिलिंद शेंडे, उपविभागीय कृषी अधिकारी विजय निमजे, तालुका कृषी अधिकारी कन्नाके, नरखेड तालुका कृषी अधिकारी डॉ. योगीराज जुमडे, काटोल पंचायत समिती सदस्य निलिमा ठाकरे, नरखेड पंचायत समिती सभापती निलिमा रेवतकर, वैभव दळवी, मनोज जवंजाळ, डॉ. अनिल ठाकरे, दिनेश मानकर, कृषी सहसंचालक डॉ. प्रज्ञा गोडघाटे आदींनी काटोल नरखेड तालुक्यातील शेतजमीनींची पाहणी केली.

त्यावेळी मोसंबी फळे झाडावरच पिवळी पडून सडत आहे त्यामुळे जवळपास साठ ते सत्तर टक्के फळांची गळती झालेली दिसून येत आहे व आजपर्यंत अशी गळ कधीच पाहिलेली नसून इतिहासात प्रथमच या प्रकारची गळ पहाण्यात येत असल्याचे वयोवृद्ध शेतकऱ्यांनी सांगितले. बाहेरुन चांगली फळे दिसत आहे ती जरी बाहेरून चांगली दिसत असली तरी आतून सडलेली असल्याने ती बाजारात विकल्यानंतर एका दिवसात खराब होत असल्याने व्यापारी ती फळे परत पाठवत आहेत.

सदर बाब कृषी विद्यापीठाचे निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी व कृषी विभागाने संयुक्तपणे सर्वेक्षण करून हा हवेतून पसरणारा बुरशीजन्य विषाणू असून यावर मेटेलॅक्झील व मॅन्कोझेब किंवा फॉसीटील ए एल या औषधींची फवारणी करावी. त्वरित सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई जाहीर करुन तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी. येत्या शनिवारी ५ सप्टेंबर रोजी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे नुकसानग्रस्त फळबाग व शेतजमीनींना भेट देऊन पाहणी करणार आहेत. 

Web Title: Disease outbreak on soybeans on the one hand; Farmers nervous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती