नागपुरात केबलमुळे होणारे विद्रुपीकरण थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 08:10 AM2020-08-17T08:10:19+5:302020-08-17T08:10:51+5:30

नागपुरात शहरातील केबल एजन्सी व इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांना लीजवर दिल्या जाईल. भूमिगत केबल नेटवर्कमुळे ओव्हरहेड केबलचे जाळे हळूहळू कमी होऊन शहराचे विद्रूपीकरण थांबणार असल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

The disfigurement caused by cable will stop in Nagpur | नागपुरात केबलमुळे होणारे विद्रुपीकरण थांबणार

नागपुरात केबलमुळे होणारे विद्रुपीकरण थांबणार

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: शहरात स्मार्ट सिटी मिशनचे सेफ अ‍ॅन्ड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कोट्यवधीचा खर्च करून ऑप्टिकल केबलचे जाळे टाकण्यात आले आहे. आता हे केबलचे नेटवर्क शहरातील केबल एजन्सी व इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांना लीजवर दिल्या जाईल. भूमिगत केबल नेटवर्कमुळे ओव्हरहेड केबलचे जाळे हळूहळू कमी होऊन शहराचे विद्रूपीकरण थांबणार असल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

नागपूर स्मार्ट अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांनी केबल ऑपरेटर आणि इंटरनेट सेवा देणाºया कंपन्यांच्या प्रतिनिधीची बैठक घेतली. यावेळी महाव्यवस्थापक (ई-गव्हर्नन्स) शील घुले आणि नागपुरातील प्रमुख केबल ऑपरेटर्स उपस्थित होते.
शहरातील केबल ऑपरेटर्स केबल टाकताना पथदिव्यांचे पोल, टेलिफोनचे पोल, झाडावरून व घरावरून केबल नेतात. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होते. तसेच वादळ व पावसामुळे केबल तुटून धोका होण्याचा संभव असतो. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात सर्वत्र भूमिगत केबल टाकण्यात आले आहेत. या अंतर्गत एकंदर ७०० जंक्शन बॉक्सेस आहेत. या जंक्शन बॉक्समधून केबल ऑपरेटर लोकांच्या घरापर्यंत भूमिगत केबल टाकून उत्तम प्रकारची सेवा नागरिकांना देऊ शकतील.

एनएसएससीडीसीएल चे फायबर नेटवर्क वापरण्यासाठी केबल ऑपरेटरला निर्धारित शुल्क अदा करावे लागेल. याबाबतचा विस्तृत प्रस्ताव एनएसएससीडीसीएलचे आगामी संचालक मंडळाचे बैठकीत ठेवण्यात येणार असल्याची माहिती मोरोणे यांनी दिली. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ही संकल्पना मांडली होती. त्यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेणारी नागपूर ही देशातील प्रथम स्मार्ट सिटी ठरणार आहे.
नागपूर स्मार्ट सिटीच्या ऑप्टिकल केबल नेटवर्कचे वर्गीकरण झोन स्तरावर, वॉर्ड स्तरावर करण्यात आले आहे अशी माहिती अर्नेस्ट अ‍ॅन्ड यंगचे विशाल नंदे यांनी दिली.

शुल्क निर्धारणासाठी कमिटी
महेश मोरोणे यांनी लीज शुल्क निर्धारित करण्यासाठी घुले व केबल ऑपरेटर यांची एक कमिटी गठित केली आहे. ही कमिटी पुढच्या आठवडयात निर्णय घेईल. कमिटीच्या अहवालावर केबल ऑपरेटर यांच्या पुढील बैठकीत चर्चा करून अंतिम प्रस्ताव संचालक मंडळच्या पुढे निर्णयासाठी ठेवण्यात येईल.

 

Web Title: The disfigurement caused by cable will stop in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.