वैद्यकीय निष्काळजीपणाच्या आरोपाची याचिका खारीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:07 AM2021-06-29T04:07:03+5:302021-06-29T04:07:03+5:30
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वैद्यकीय निष्काळजीपणाच्या आरोपाची याचिका खारीज केली. त्यामुळे संबंधित रुग्णालये व डॉक्टर्सना दिलासा ...
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वैद्यकीय निष्काळजीपणाच्या आरोपाची याचिका खारीज केली. त्यामुळे संबंधित रुग्णालये व डॉक्टर्सना दिलासा मिळाला. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला.
पत्नी व नवजात मुलाचा मृत्यू झाल्यामुळे हर्षद टोपरे यांनी ही याचिका दाखल करून अभियोग रुग्णालय, हेल्थ सिटी चिल्ड्रेन रुग्णालय व सेव्हन स्टार रुग्णालय आणि या रुग्णालयांच्या डॉक्टर्सवर वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप केला होता. या प्रकरणाचा सीबीआय, सीआयडी किंवा अन्य स्वतंत्र एजन्सीमार्फत तपास करण्यात यावा आणि दोषी रुग्णालये व डॉक्टर्सविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली होती. ही याचिका प्रलंबित असताना सहा वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीने प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर केला. त्यात संबंधित रुग्णालये व डॉक्टर्सनी रुग्णाची योग्य काळजी घेतल्याचे व वैद्यकीय निष्काळजीपणा झाला नसल्याचे मत दिले. त्यामुळे न्यायालयाने ही याचिका खारीज केली.