मुस्लीम राष्ट्रीय मंचमध्ये संघाविरोधात नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 07:40 PM2018-06-05T19:40:33+5:302018-06-05T19:40:49+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत मुस्लीम राष्ट्रीय मंचतर्फे संघ स्मृतिमंदिरात ‘इफ्तार’च्या आयोजनाची मागणी संघाने फेटाळून लावली. या मुद्यावरून मुस्लीम राष्ट्रीय मंचमध्ये नाराजीचा सूर आहे. मंचचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक मोहम्मद फारुक शेख यांनी तर संघाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून संघाचे अ.भा.कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमार यांच्याकडे नाराजी बोलून दाखविली आहे.

Displeasure against Sangh in Muslim National Forum | मुस्लीम राष्ट्रीय मंचमध्ये संघाविरोधात नाराजी

मुस्लीम राष्ट्रीय मंचमध्ये संघाविरोधात नाराजी

Next
ठळक मुद्दे‘इफ्तार’ला नकार दिल्याचा मुद्दा : इंद्रेश कुमार यांच्याकडे व्यक्त केली नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत मुस्लीम राष्ट्रीय मंचतर्फे संघ स्मृतिमंदिरात ‘इफ्तार’च्या आयोजनाची मागणी संघाने फेटाळून लावली. या मुद्यावरून मुस्लीम राष्ट्रीय मंचमध्ये नाराजीचा सूर आहे. मंचचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक मोहम्मद फारुक शेख यांनी तर संघाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून संघाचे अ.भा.कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमार यांच्याकडे नाराजी बोलून दाखविली आहे.
मुस्लीम राष्ट्रीय मंचकडून ‘रमजान’च्या निमित्ताने देशभरातील विविध ठिकाणी ‘इफ्तार’चे आयोजन करण्यात येत आहे. संघ स्मृतिमंदिर परिसरातदेखील ‘इफ्तार’चे आयोजन करण्याची विनंती मंचकडून करण्यात आली होती. मात्र संघ पदाधिकाऱ्यांनी ही विनंती फेटाळून लावली. शहरात इतर ठिकाणी मंचतर्फे ‘इफ्तार’चे आयोजन करण्यात आले. मुस्लिमांना संघाशी जोडण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला होता. संघाबाबत मुस्लीम समाजात नकारात्मक भावना आहे. ती दूर करण्यासाठी अनेक वर्षांपासून आम्ही काम करतो आहे. सामाजिक समरसता वाढावी यासाठी मागील दोन महिन्यांपासून आम्ही स्मृतिमंदिरात ‘इफ्तार’चे आयोजन व्हावे, यासाठी प्रयत्न करत होतो. यासाठी निवेदनदेखील सादर केले होते. मात्र आम्हाला नकारच मिळाला, असे प्रतिपादन मोहम्मद फारुक शेख यांनी केले.
मुस्लीम का जुळू शकत नाहीत ?
संघाशी बौद्ध, जैन, शीख समाजाचे लोक जुळले आहेत. मुस्लीम समाजातील लोकांमधील पूर्वग्रह दूर करून त्यांना संघाकडे आणण्यासाठी आम्ही कार्य करतो आहे. यामुळे सामाजिक एकतादेखील वाढीस लागेल. जर बाकीचे लोक संघाशी जुळू शकतात, तर मुस्लीम का नाही, असा प्रश्न मोहम्मद फारुक शेख यांनी उपस्थित केला. एक कार्यकर्ता या नात्यानेच मी संघाकडे आपला हक्क मागितला होता. इंद्रेश कुमार यांना याबाबत कळविले असून त्यांनी २० जून रोजी होणाऱ्या मंचच्या राष्ट्रीय बैठकीत हा मुद्दा ठेवण्याची सूचना केली आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, मुस्लीम राष्ट्रीय मंचने संघ मुख्यालय किंवा स्मृतिमंदिर येथे ‘इफ्तार’साठी कुठलीही परवानगी मागितली नसल्याचे मुस्लिम राष्ट्रीय मंचचे राष्ट्रीय संघटन संयोजक विराग पाचपोर यांनी स्पष्ट केले.

Web Title: Displeasure against Sangh in Muslim National Forum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.