शाेषखड्ड्यातून सांडपाण्याची विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:07 AM2021-07-05T04:07:14+5:302021-07-05T04:07:14+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : गावकऱ्यांचे सुदृढ आराेग्य राखायचे असेल तर गावातील सांडपाण्याचे याेग्य नियाेजन करणे गरजेचे आहे. याकरिता ...

Disposal of wastewater from sewage | शाेषखड्ड्यातून सांडपाण्याची विल्हेवाट

शाेषखड्ड्यातून सांडपाण्याची विल्हेवाट

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : गावकऱ्यांचे सुदृढ आराेग्य राखायचे असेल तर गावातील सांडपाण्याचे याेग्य नियाेजन करणे गरजेचे आहे. याकरिता शाेषखड्ड्यांच्या माध्यमातून सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याचा स्तुत्य उपक्रम घोराड ग्रामपंचायतने सुरू केला असून, आतापर्यंत गावात सार्वजनिक १४ तर ४० वैयक्तिक शोषखड्डे तयार करण्यात आले आहे.

घरासभाेवताल, रस्त्यात आणि गटारीत तुंबलेले सांडपाणी आरोग्यास घातक असते. त्याचा घाण वास येतो. या पाण्याने रस्त्यावर चिखल हाेऊन घसरण निर्माण होते. शिवाय, डासांना अंडी घालायला जागा मिळून त्यांची पैदास वाढते. डासांमुळे मलेरियासारखे आजार होतात. त्यामुळे सांडपाण्याची याेग्य विल्हेवाट लावण्यासाठी जमिनीत सांडपाणी जिरविण्यासाठी शोषखड्डा महत्त्वपूर्ण ठरतो.

सध्या सांडपाण्याची विल्हेवाट नालीच्या माध्यमातून होत असते. परंतु नाली बांधकाम केल्यानंतर जर ती तुंबली तर उपसा करायला ग्रामपंचायतकडे पैसे नसताे. विशेष म्हणजे प्रत्येक ठिकाणी नाली बांधकाम होऊ शकत नाही. नाली आणि सिमेंट रोडमुळे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. नुसते पाणी उपसा करण्याचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत शोषखड्डे हे जमिनीत पाणी मुरविण्याचे उत्तम माध्यम आहे. प्रत्येक ग्रामपंचायतने असे उपक्रम घेणे गरजेचे झाले आहे.

घरातील सांडपाणी मुद्दाम तयार केलेल्या शोषखड्ड्यात सोडल्याने ते जमिनीत मुरते. आंघोळीच्या मोरीतील, धुण्याभांडीच्या पाण्याचीही विल्हेवाट शोषखड्ड्याद्वारे होऊ शकते. वाळू असलेल्या, मुरमाड जमिनीत या पाण्याचा चांगला निचरा होतो. पण चिकणमाती असलेल्या जमिनीत मात्र याचा फारसा उपयोग होत नाही. अशावेळी चर खणून पाण्याला दूर न्यावे लागते. त्यामुळे रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यास आळा बसतो व त्यापासून रोगराई टाळण्यास मदत होते. त्यामुळे शोषखड्डे तयार करणे उपयोगाचे ठरते, असे सरपंच मंगेश गोतमारे यांनी सांगितले.

...

शोषखड्ड्याजवळ झाडे लावल्याने निसर्गाचा समतोल राखला जातो. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे डासांचे प्रमाण कमी होते व त्रासही कमी होतो. डासांपासून मलेरियासारखे पसरणारे आजार होत नाहीत व आरोग्य सुदृढ राहते.

- महेश्वर डोंगरे, खंडविकास अधिकारी, पंचायत समिती, कळमेश्वर

...

सध्या शासनातर्फे जलशक्ती अभियान सुरू आहे. या माध्यमातून प्रत्येक कुटुंबामागे एक शोषखड्डा आणि प्रत्येक घरी छतावरील पाणी जमिनीत मुरविण्याचे काम केल्यास खऱ्या अर्थाने पाणी जमिनीत मुरू शकते आणि पाण्याची पातळीसुद्धा वाढू शकते. म्हणजेच सद्यस्थितीत जमिनीतील पाण्याचा उपसा जास्त प्रमाणात असल्याने भूजल पातळी कमी होत आहे. त्यावर हा शोषखड्ड्याचा सर्वात रामबाण उपाय होऊ शकतो.

- संदीप गाेडशलवार, खंडविकास अधिकारी (मनरेगा), जि. प. नागपूर

Web Title: Disposal of wastewater from sewage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.