कचऱ्याची विल्हेवाट तुम्हीच लावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:06 AM2020-12-23T04:06:54+5:302020-12-23T04:06:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वर्षभरापूर्वी कचरा वर्गीकरणाची सक्ती करूनही त्याची शहरात अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. याचा विचार ...

Dispose of waste yourself! | कचऱ्याची विल्हेवाट तुम्हीच लावा!

कचऱ्याची विल्हेवाट तुम्हीच लावा!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वर्षभरापूर्वी कचरा वर्गीकरणाची सक्ती करूनही त्याची शहरात अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. याचा विचार करता मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने १०० किलोहून अधिक कचरा निघणाऱ्या सोसायट्यांना कचऱ्याची तुम्हीच विल्हेवाट लावा, अशा आशयाचे पत्र पाठविले आहे. यासाठी सुरुवातीला प्रत्येक झोनमधील दोन सोसायट्यांची निवड करण्यात आली आहे. सोबतच शहरातील सर्वच मोठ्या सोसायट्यांना कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्याचे आवाहन केले आहे.

शहरात दररोज ११०० मेट्रिक टन कचरा निघतो. परंतु ओला व सुका कचरा पूर्णपणे वेगवेगळा संकलित केला जात नाही. यातील फक्त २०० मेट्रिक टन कचरा वेगवेगळा संकलित केला जातो. कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीचा करार संपुष्टात आल्यानंतर, महापालिकेने १६ नोव्हेंबर २०१९ पासून शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी ए. जी. एन्व्हायरो आणि बीव्हीजी या कंपन्यांना सोपविली आहे. त्यानुसार या दोन्ही कंपन्या दररोज शहरातून ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करणे अपेक्षित होते. परंतु वर्षभरानंतरही यात अपेक्षित सुधारणा झालेली नाही.

...

प्रत्येक झोनमधील दोन सोसायट्यांना पत्र

१०० किलोहून अधिक कचरा निघाणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांना कचऱ्याची विल्हेवाट स्वत: लावावयाची आहे. यासंदर्भात वर्षभरापूर्वीच मनपा प्रशासनाने निर्देश दिले होते. अशा सोसायट्यातील कचरा मनपा उचलणार नाही, असे स्पष्ट केले होते. परंतु अजूनही बहुसंख्य सोसायट्यांनी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा निर्माण केलेली नाही. त्यामुळे प्रत्येक झोनमधील दोन सोसायट्यांना यासंदर्भात पत्र पाठविण्यात आले आहे.

...

Web Title: Dispose of waste yourself!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.