कचऱ्याची विल्हेवाट तुम्हीच लावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:06 AM2020-12-23T04:06:57+5:302020-12-23T04:06:57+5:30

सोसाट्यांनी परिसरात ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित न केल्यास सुका कचरा उचलला जााणार नाही. अशी भूमिका मनपा ...

Dispose of waste yourself! | कचऱ्याची विल्हेवाट तुम्हीच लावा!

कचऱ्याची विल्हेवाट तुम्हीच लावा!

Next

सोसाट्यांनी परिसरात ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित न केल्यास सुका कचरा उचलला जााणार नाही. अशी भूमिका मनपा प्रशासनाने घेतली होती. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केल्यास सोसायट्यांनाच यापासून आर्थिक लाभ होणार आहे. परंतु त्यानंतरही बहुसंख्य सोसायट्यात ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करत नाही.

....

दंडात्मक कारवाईचा दिला होता इशारा

ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित न केल्यास महापालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला होता. परंतु दंडात्मक कारवाई झाली नाही. राज्यातील काही महापालिकांकडून सोसाट्यांना कचरा वर्गीकरण न केल्यास पाच हजारांचा दंड आकारला जात आहे

.

....

महापालिकेने प्रत्येक झोनमधील दोन सोसायट्यांना पत्र पाठवून ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करून ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आवाहन केले आहे. मनपाने स्वच्छता निरीक्षक नेमले आहेत. घरोघरी कचरा वर्गीकरणाचा संदेश पोहोचविणे व त्याची अंमलबजावणी कृतीमध्ये होणे अपेक्षित आहे. कचरा वर्गीकरणात दंडात्मक कारवाईपेक्षा नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.

डॉ. प्रदीप दासरवार, उपायुक्त (घनकचरा) मनपा

Web Title: Dispose of waste yourself!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.