रिपाइंतील शहर अध्यक्षपदाचा वाद अखेर संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 02:23 PM2017-11-25T14:23:53+5:302017-11-25T14:24:37+5:30

मागील अनेक दिवसांपासून रिपाइं (आ) च्या शहर अध्यक्षपदावरून वाद सुरू होता. पक्षामध्ये दोन शहराध्यक्ष स्वतंत्रपणे वावरत होते. परंतु शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविभवन येथे पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत हा वाद कायमचा संपुष्टात आला.

The dispute of city president of the Republican Party is finally settled | रिपाइंतील शहर अध्यक्षपदाचा वाद अखेर संपुष्टात

रिपाइंतील शहर अध्यक्षपदाचा वाद अखेर संपुष्टात

Next
ठळक मुद्देबाळू घरडे शहराध्यक्ष, राजन वाघमारे विदर्भ प्रवक्ते

आॅनलाईन लोकमत
नागपूर : मागील अनेक दिवसांपासून रिपाइं (आ) च्या शहर अध्यक्षपदावरून वाद सुरू होता. पक्षामध्ये दोन शहराध्यक्ष स्वतंत्रपणे वावरत होते. परंतु शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविभवन येथे पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत हा वाद कायमचा संपुष्टात आला. या बैठकीत नागपूर शहर अध्यक्ष म्हणून बाळू घरडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तर राजन वाघमारे यांच्याकडे विदर्भ प्रवक्तेपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली.
रिपाइं (आ) च्या शहर अध्यक्षपदाबाबत सुरुवातीपासूनच वाद सुरू होता. बाळू घरडे व राजन वाघमारे हे दोघेही या पदासाठी इच्छुक होते. प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांनी राजन वाघमारे यांची शहराध्यक्ष म्हणून निवड केली होती. तेव्हा बाळू घरडे यांनी या निवडीवर आक्षेप घेतला होता. ही निवड नियमबाह्य असल्याचे त्यांचे म्हणणे होते. मध्यंतरी घरडे यांनी शक्तिप्रदर्शन करीत शहरातील कार्यकर्त्यांची एक स्वतंत्र बैठक घेतली होती. त्या बैठकीत थेट प्रदेशाध्यक्ष हटविण्याची मागणी केली होती. हा वाद राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्यापर्यंत पोहोचला होता. दरम्यानच्या काळात वाघमारे आणि घरडे हे दोघेही स्वतंत्रपणे शहर अध्यक्ष म्हणूनच वावरत होते. दोन पदाधिकाऱ्यांमधील वादामुळे कार्यकर्त्यांची मोठी पंचाईत होत होती.
अखेर प्रदेशाध्यक्ष थुलकर यांनी शुक्रवारच्या बैठकीत हा वाद संपुष्टात आणला. शहर अध्यक्ष म्हणून बाळू घरडे यांच्या नावाची घोषणा केली. तसेच राजन वाघमारे यांच्याकडे विदर्भ प्रवक्तापदाची जबाबदारी सोपविली. याशिवाय त्यांच्याकडे आणखी महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. इतर पदाधिकाऱ्यांची निवड लवकरच केली जाणार आहे.
बैठकीत भूपेश थुलकर यांच्यासह राजन वाघमारे, आर.एस. वानखेडे, बाळू घरडे, भीमराव कांबळे, राजू बहादुरे, डॉ. मनोज मेश्राम, विनोद थुल आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: The dispute of city president of the Republican Party is finally settled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.