नागपूरनजीकच्या   पाचगाव जिल्हा परिषद शाळेचा वाद उफाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 11:59 PM2018-04-04T23:59:52+5:302018-04-05T00:00:03+5:30

उमरेड तालुक्यातील पाचगावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये धुमसणारा सेवानिवृत्त मुख्याध्यापक व वर्तमान शिक्षिकेमधील वाद चांगलाच उफाळला आहे. शिक्षिकेद्वारे विनयभंगाचा गुन्हा नोंदविल्यानंतर संबंधित मुख्याध्यापकाने खुलासा करण्यासाठी बुधवारी पत्रकार परिषद बोलावली असताना शिक्षिका व तिच्या सहकाऱ्यांनी पत्रकार भवनातच गोंधळ घातला.

Dispute erupted at Panchagaon Zilla Parishad School of Nagpur | नागपूरनजीकच्या   पाचगाव जिल्हा परिषद शाळेचा वाद उफाळला

नागपूरनजीकच्या   पाचगाव जिल्हा परिषद शाळेचा वाद उफाळला

Next
ठळक मुद्देमुख्याध्यापकाच्या पत्रपरिषदेत शिक्षिकेचा गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर धंतोली पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण निवळण्याचा प्रयत्न केला.
काही दिवसांपूर्वी संबंधित शिक्षिकेने शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापकाविरोधात कुही पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा नोंदविला होता. आपल्यावर लावलेले आरोप खोटे आहेत, हे सांगण्यासाठी मुख्याध्यापकांनी पत्रकार भवनात पत्रपरिषद बोलावली होती. संबंधित शिक्षिका आणि शाळेतील एक कर्मचारी शाळेत अश्लील वर्तन करीत असल्याचे सांगत, इतर प्रशासकीय गैरव्यवहार केल्याचा आरोप मुख्याध्यापकांनी केला. याबाबत जि.प.चे शिक्षणाधिकाऱ्यांनाही चित्रफितीसह तक्रार दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र शिक्षणाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे ते म्हणाले. त्यांची पत्रपरिषद सुरू असताना त्यांच्या विरोधात असणाऱ्या शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तेथे येऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांनी मुख्याध्यापकांना शिवीगाळ करणे सुरू केले. त्यांच्याकडून आरोप होत असताना त्याला प्रत्युत्तर देत माजी मुख्याध्यापकाने थेट न्यायालयातच उत्तर देईन, असा इशारा यावेळी दिला.
दरम्यान शिक्षिका व त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रपरिषद घेत मुख्याध्यापकावर शाळेतील सहकर्मी शिक्षिका व शाळेतील विद्याथिर्शीनीसोबत अश्लील वर्तन केल्याचा आरोप केला. आपली बाजू मांडताना शिक्षिकेने संबंधित माजी मुख्याध्यापक निवृत्तीनंतरही शाळेत येतात आणि पुरस्कार मिळवून देण्यासाठी शरीरसुखाची मागणी करतात, असा आरोप केला.
दोन्ही पक्षाच्या तक्रारी जि.प.चे शिक्षणाधिकारी आणि कुही पोलीस ठाण्यात दाखल आहेत. दोन्ही पक्षाकडून एकमेकांविरोधात आगपाखड केल्याने हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे असल्याचे लक्षात येते. मात्र हा वाद शिक्षिणाधिकारी, पोलीस ठाणे आणि न्यायालयावाटे थेट पत्रकारभवनापर्यंत पोहोचला.

Web Title: Dispute erupted at Panchagaon Zilla Parishad School of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.