विदर्भात बाधित व मृत्यू वाढीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:07 AM2021-03-19T04:07:59+5:302021-03-19T04:07:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गत पाच दिवसांप्रमाणे गुरुवारीदेखील विदर्भात दैनंदिन रुग्णसंख्येने नवा विक्रम गाठला. २४ तासांत ६ हजार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गत पाच दिवसांप्रमाणे गुरुवारीदेखील विदर्भात दैनंदिन रुग्णसंख्येने नवा विक्रम गाठला. २४ तासांत ६ हजार ६९६ नवे रुग्ण आढळले, तर ४६ रुग्णांचा मृत्यू झाला. २४ तासांत रुग्णसंख्येत ४३१ ने वाढ झाली असून, मृत्युसंख्या दोनने वाढली आहे. रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ९३ हजार ६४८ इतकी झाली आहे. नागपुरात तर बुधवारहून अधिक रुग्णांची नोंद झाली. गुरुवारी तब्बल ३ हजार ७९६ बाधित रुग्ण आढळले. सव्वा तीन हजारांहून अधिक पॉझिटिव्हची नोंद झाली. हा आतापर्यंतचा एका दिवसातील सर्वांत मोठा आकडा आहे. बुलडाण्यात बुधवारी रुग्णसंख्या १९५ ने वाढली. तेथे ८८५ रुग्ण व ३ मृत्यूंची नोंद झाली. अकोल्यामध्येदेखील किंचित घट झाली असून, ४२७ रुग्ण नोंदविले गेले. वर्धा येथे २५५, चंद्रपुरात १३६, तर यवतमाळमध्ये ३२५ रुग्णांची नोंद झाली. गोंदिया येथे सर्वात कमी ५१ रुग्ण आढळले. गडचिरोलीत ५४ रुग्ण सापडले व एकूण रुग्णांची संख्या १० हजारांवर पोहोचली.
जिल्हानिहाय आकडेवारी
जिल्हा : रुग्ण : मृत्यू
नागपूर : ३,७९६ : २३
वर्धा : २५५ : ०४
गोंदिया : ५१ :००
भंडारा : ९९ :००
चंद्रपूर : १३६ : ०१
गडचिरोली : ५४ :००
अमरावती : ४६५ : ०३
वाशिम : २०३ : ०२
बुलडाणा : ८८५ : ०३
यवतमाळ : ३२५: ०७
अकोला : ४२७ : ०३