नागपुरात ‘रेड झोन’च्या अट्टहासामुळे नागरिकांमध्ये असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 08:58 PM2020-05-23T20:58:30+5:302020-05-23T21:01:20+5:30

शहरातील केवळ काही वस्त्या वगळता इतर भागात कोरोना प्रादुर्भाव नाही. त्यामुळे या भागात उद्योगधंदे सुरू करून नागरिकांना दिलासा देणे अपेक्षित होते. परंतु केवळ मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अट्टहासामुळे नागपूर शहर रेड झोनमध्ये सामील करण्यात आले. या निर्णयामुळे शहरातील सर्वपक्षीय नेत्यांसोबतच नागरिकांमध्येही असंतोष पसरला असून याचा भडका केव्हाही उडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Dissatisfaction among citizens due to 'Red Zone' in Nagpur | नागपुरात ‘रेड झोन’च्या अट्टहासामुळे नागरिकांमध्ये असंतोष

नागपुरात ‘रेड झोन’च्या अट्टहासामुळे नागरिकांमध्ये असंतोष

Next
ठळक मुद्देभडका उडण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील केवळ काही वस्त्या वगळता इतर भागात कोरोना प्रादुर्भाव नाही. त्यामुळे या भागात उद्योगधंदे सुरू करून नागरिकांना दिलासा देणे अपेक्षित होते. परंतु केवळ मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अट्टहासामुळे नागपूर शहर रेड झोनमध्ये सामील करण्यात आले. या निर्णयामुळे शहरातील सर्वपक्षीय नेत्यांसोबतच नागरिकांमध्येही असंतोष पसरला असून याचा भडका केव्हाही उडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मोमिनपुरा, संतरंजीपुरा, शांतिनगर या वस्त्यांमध्ये काही रुग्ण आहेत. इतर ठिकाणी फारसे रुग्ण नाहीत. नागपूरची सध्याची स्थिती पाहता आजवर ४०९ रुग्ण आढळले. त्यातील सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर २९८ जण आजारातून पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. म्हणजेच सध्या नागपुरात १०४ रुग्ण आहेत. यात तीन जण जिल्ह्याबाहेरचे आहेत. बाधित वस्त्यांना सील करून तेथील नागरिकांची आरोग्य तपासणी, चाचण्या मोठ्या प्रमाणावर करण्याची सूचना करण्यात आली आहे. परंतु त्यासाठी उर्वरित शहरातील जनजीवन विस्कळीत करण्यात काहीच अर्थ नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. परंतु आयुक्त मुंढे यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना विनाकारण बंदिस्त राहावे लागत आहे. काही कंटेन्मेंट परिसरात नागरिकांना बळजबरीने क्वारंटाईन केले जात आहे. गड्डीगोदाम भागात या विषयावरून नागरिकांनी विरोधही केला होता. नागरिक स्वत: क्वारंटाईन होण्यास तयार होते; परंतु त्यांना प्रशासनाकडून त्याबाबतचे पत्र हवे होते, मात्र तशी कुठलीही रीतसर माहिती न देता नागरिकांना घेऊन जात असल्याने नागरिकांनी विरोध दर्शविला होता. अशीच मनमानी क्वारंटाईन सेंटर सुरू करण्याबाबतही दिसून आली. वस्त्यांमध्ये उघडणाऱ्या क्वारंटाईन सेंटरला स्थानिक नागरिकांचा विरोध पत्करावा लागला होता.
लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यापार, धंदे बंद आहेत. नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. तब्बल दोन महिन्यानंतर सर्व काही सुरळीत सुरू होईल, अशी अपेक्षा होती. कंटेन्मेंट परिसर सोडून उर्वरित शहरातील नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु केवळ मनपा आयुक्त मुंढे यांनी ते होऊ दिले नाही. आणखी काही दिवस रेड झोन कायम करण्यात आला. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांसोबत नागरिकही संतप्त झाले आहेत.

Web Title: Dissatisfaction among citizens due to 'Red Zone' in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.