रेल्वेच्या पदोन्नती परीक्षा रद्द केल्यामुळे असंतोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:07 AM2021-05-14T04:07:38+5:302021-05-14T04:07:38+5:30
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कर्मचाऱ्यांच्या बढती परीक्षा रद्द केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ...
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कर्मचाऱ्यांच्या बढती परीक्षा रद्द केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात अभियांत्रिकी, कॅरेज अँड वॅगन, वाणिज्य आणि विविध विभाग आहेत. या विभागातील बढतीस पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांच्या दरवर्षी परीक्षा होतात. परंतु कोरोनाचे कारण पुढे करुन या बढती परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. एकीकडे सगळ्या विभागातील कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्यात येत आहे. मग परीक्षा रद्द करण्याची काय गरज होती, असा प्रश्न संबंधित कर्मचारी उपस्थित करीत आहेत.
...........
परीक्षा रद्द करणे चुकीचे
‘एकीकडे विभागातील १०० टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्यात येत आहे. डीआरएम कार्यालय तुम्ही कोरोनाच्या भीतीने बंद ठेवता. परीक्षा घ्यावी लागेल, या भीतीने परीक्षा रद्द करणे चुकीचे आहे.
-हबीब खान, कार्यकारी अध्यक्ष नॅशनल रेल्वे मजदुर युनियन
................