‘फेक न्यूज’चा प्रसार, केवळ १६ गुन्हे दाखल; पोलिसांचा वचक नाही, कारवाईचे प्रमाण कधी वाढणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2021 07:00 AM2021-11-09T07:00:00+5:302021-11-09T07:00:07+5:30

‘लोकमत’ला प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार पावणे सहा वर्षांत केवळ १६ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. ‘फेक न्यूज’चे एकूण प्रमाण लक्षात घेता गुन्ह्यांची संख्या अतिशय कमी असून कारवाईचे प्रमाण कधी वाढणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Dissemination of 'fake news', only 16 cases registered; The police have no qualms, when will the scale of action increase? | ‘फेक न्यूज’चा प्रसार, केवळ १६ गुन्हे दाखल; पोलिसांचा वचक नाही, कारवाईचे प्रमाण कधी वाढणार ?

‘फेक न्यूज’चा प्रसार, केवळ १६ गुन्हे दाखल; पोलिसांचा वचक नाही, कारवाईचे प्रमाण कधी वाढणार ?

Next
ठळक मुद्देपावणे सहा वर्षांत नावापुरतीच कारवाई 

योगेश पांडे

नागपूर : ‘सबकुछ ऑनलाईन’च्या जमान्यात प्रसारमाध्यमेदेखील ‘ई’ चावडीवर सहजपणे उपलब्ध होतात. परंतु अनेकदा कुठलीही शहानिशा न करता नागरिकांकडून ‘फेक न्यूज’ एकमेकांना पाठविण्यात येतात. यातून अनेकदा सामाजिक सौहार्दालादेखील धोका निर्माण होतो. मात्र असे असतानादेखील पोलिसांकडून यासंदर्भात कारवाईसाठी ठोस पावले उचलण्यात येत नसल्याचे चित्र आहे. ‘लोकमत’ला प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार पावणे सहा वर्षांत केवळ १६ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. ‘फेक न्यूज’चे एकूण प्रमाण लक्षात घेता गुन्ह्यांची संख्या अतिशय कमी असून कारवाईचे प्रमाण कधी वाढणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मागील काही वर्षांत ‘स्मार्टफोन्स’ वापरणाºयांची संख्या प्रचंड वाढली आहे. विविध वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्यांचे ‘वेबपोर्टल्स’ असून त्यावर नियमितपणे बातम्या ‘अपडेट’ होतात. परंतु अनेकदा ही वर्तमानपत्रे किंवा वृत्तवाहिन्यांचे नावाखाली खोटे वृत्त तयार केले जाते व ते ‘सोशल मिडीया’वर पसरविले जाते. याचप्रमाणे अनामिक म्हणूनदेखील अनेकदा खोटे वृत्त विविध ‘प्लॅटफॉर्म्स’वर ‘पोस्ट’ करण्यात येते. एखाद्या परिचिताने पाठविले म्हणून ते इतरांकडूनदेखील समोर ‘फॉरवर्ड’ होते. असे प्रकार दररोज घडत असतात. परंतु असे करणे हा प्रकार ‘सायबर’ गुन्ह्यांमध्ये येतो. असे करणाºयांविरोधात ‘आयटी अॅक्ट’मधील कलम ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करता येऊ शकतो. २०१६ सालापासून नागपुरात ‘फेक न्यूज’संदर्भात विविध तक्रारी झाल्या व नागपूर पोलिसांनी एकूण १६ प्रकरणात गुन्हे दाखल केले.

‘कोरोना’ वर्षात एकच गुन्हा

२०१६ मध्ये ४, २०१७ मध्ये २, व २०१८ साली तीन व २०१९ मध्ये आॅगस्ट महिन्यापर्यंत तीन गुन्हे दाखल झाले. २०२१ मध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत ३ गुन्हे दाखल झाले होते. २०२० मध्ये सर्वात जास्त ‘फेक न्यूज’ सोशल माध्यमांवर दिसून आल्या. मात्र त्या वर्षात एकच गुन्हा दाखल झाला.

तक्रारीसाठी लोकच पुढे येत नाही

दररोज विविध ‘प्लॅटफॉर्म’वर ‘फेक न्यूज’ दिसून येतात. यातील काही बातम्या या सामाजिक सौहार्द बिघडविणाºया किंवा समाजात संभ्रम निर्माण करणाºयादेखील असू शकतात. यासंदर्भात तक्रारीसाठी लोक पुढे येत नाही. त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे, अशी माहिती एका पोलिस अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

वर्षनिहाय कारवाई

वर्ष - दाखल गुन्हे

२०१६ - ४

२०१७ - २

२०१८ - ३

२०१९ - ३

२०२० - १

२०२१ - ३

Web Title: Dissemination of 'fake news', only 16 cases registered; The police have no qualms, when will the scale of action increase?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.