ताडोब्याचा परिसर येणार ई-सर्व्हिलन्सच्या आवाक्यात
By Admin | Published: March 1, 2015 02:31 AM2015-03-01T02:31:57+5:302015-03-01T02:31:57+5:30
महाराष्ट्रात पहिल्यांदाच ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेला परिसर आता ‘ई-सर्व्हिसेंस’ तंत्रज्ञानाच्या आवाक्यात येणार आहे.
नागपूर : महाराष्ट्रात पहिल्यांदाच ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेला परिसर आता ‘ई-सर्व्हिसेंस’ तंत्रज्ञानाच्या आवाक्यात येणार आहे. यासाठी प्राथमिक स्तरावर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या चांदा येथील कोठारी व ब्रह्मपुरी येथील सिंदेवाही वन परिक्षेत्रात केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेल्या एका कंपनीने सविस्तर सर्वे केला आहे.
. ही यंत्रणा पहिल्यांदा २०१२ मध्ये उत्तर प्रदेशातील जिम कार्बेट व्याघ ्रप्रकल्पात सुरू करण्यात आली होती. या अंतर्गत संवेदनशील भागांमध्ये एका निश्चित जागेवर उंच टॉवर तयार करून हाय रेजोलेशन कॅमेरे लावले जातात. या कॅमेऱ्यांची विशेषत: म्हणजे या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वन क्षेत्रांमध्ये २ ते १० किलोमीटर अंतरापर्यंत लक्ष ठेवता येते. यासोबतच कॅमेरे २४ तास सातत्याने ३६० डिग्रीमध्ये फिरतो व व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा करतील. सर्व कॅमेरे वायरलेस कनेक्शनच्या माध्यमातून नियंत्रण कक्षातील सर्व्हरशी जुळलेले असतील. संबंधित नियंत्रण कक्षात बसलेला वन कर्मचारी जंगलातील कोणत्याही क्षेत्रात घुसखोरीची शक्यता आढळून आल्यास गश्तीवर असलेल्या चमूला सूचित करेल. अशाप्रकारे जंगलाचे रक्षण करता येईल. २४ तास रेकॉर्डिंग होत असल्याने घुसखोरी, शिकार व इतर गोष्टी त्यात कैद होतील, त्या तपासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतील.
यासंबंधात शुक्रवारी वन मुख्यालयात प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सर्जन भगत यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित कंपनीने प्रेझेंटेशन सादर केले. दरम्यान अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) बी.एस. रेड्डी, एपीसीसीएफ मोईपुकीम अय्यर, सीसीएफ एस.पी. ठाकरे, कंपनीचे तांत्रिक सल्लागार राहुल दुबे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांनी कॅमेरे लावण्याबाबत सहमती दर्शविल्याची माहिती आहे.(प्रतिनिधी)