घरकूल लाभार्थ्यांना बांधकाम निधी वितरित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:08 AM2021-01-21T04:08:58+5:302021-01-21T04:08:58+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : प्रधानमंत्री आवास याेजनेंतर्गत मंजूर घरकूल लाभार्थ्यांना बांधकामासाठी निधी वितरित करण्यात यावा तसेच कामठी नगर ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : प्रधानमंत्री आवास याेजनेंतर्गत मंजूर घरकूल लाभार्थ्यांना बांधकामासाठी निधी वितरित करण्यात यावा तसेच कामठी नगर परिषद क्षेत्रातील विविध प्रलंबित समस्या साेडविण्याबाबतचे निवेदन भाजप नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना नुकतेच साेपविले.
प्रधानमंत्री आवास योजना, अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना, अतिवृष्टीमुळे झालेली नुकसानभरपाई तसेच इतर प्रलंबित मागण्या साेडविण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी नगरसेवक लालसिंग यादव यांनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ६८८ लाभार्थ्यांचा डीपीआर मंजूर असून, लाभार्थ्यांना पट्टे वाटप देखील करण्यात आले आहे. परंतु नगर परिषदेने काही मोजक्या लाभार्थ्यांना घरकूल बांधण्याकरिता निधी दिला तर काही लाभार्थ्यांना १ किंवा २ टप्प्यात एक लाखाचे अनुदान देण्यात आले. इतर लाभार्थ्यांना मंजुरी असूनही अनुदान देण्यात आले नाही. त्यामुळे ते घरकूल बांधू शकत नाही, याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. वंचित लाभार्थ्यांना तातडीने निधी वितरित करावा तसेच प्रभाग १४ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेसाठी प्लेन टेबल सर्व्हे करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे. यावेळी जिल्हाधिकारी रवींद ठाकरे यांनी याेग्य कारवाई करण्याचे निर्देश मुख्याधिकारी संदीप बाेरकर यांना दिले. शिष्टमंडळात न. प. विरोधी पक्षनेता लालसिंग यादव, नगरसेवक प्रतीक पडोळे, भाजपचे महामंत्री उज्ज्वल रायबोले यांची उपस्थिती हाेती.