भाविकांना ताजा प्रसाद वाटप करा; गणेश मंडळांना एफडीएच्या सूचना

By मोरेश्वर मानापुरे | Published: September 16, 2023 06:23 PM2023-09-16T18:23:41+5:302023-09-16T18:23:54+5:30

गणेश मंडळांनी काय करावे?

distribute fresh prasad to devotees; FDA Notice to Ganesha Mandals | भाविकांना ताजा प्रसाद वाटप करा; गणेश मंडळांना एफडीएच्या सूचना

भाविकांना ताजा प्रसाद वाटप करा; गणेश मंडळांना एफडीएच्या सूचना

googlenewsNext

नागपूर: गणेश मंडळांनी प्रसाद तयार करताना आणि वितरित करताना स्वच्छेतच्या नियमांचे काटेकोर पालन करावे करावे. प्रसाद तयार करून वितरित करणाऱ्या गणेश मंडळांनी अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाकडे नोंदणी कराव्यात, अशा सूचना अन्न व औषध प्रशासनाने मंडळांना दिल्या आहेत.
गणेश मंडळांनी काय करावे?

- आवश्यक तेवढाच ताजा प्रसाद भाविकांना वाटप करावा, शिळ्या अन्नपदार्थांचे वाटप करू नये.
- प्रसाद काचेच्या झाकणात किंवा पारदर्शक प्लास्टिकच्या आवरणात झाकून ठेवावा.
- प्रसाद हाताळण्यांचे कपडे स्वच्छ असावेत. साबणाने हात स्वच्छ धुवूनच कामाला सुरूवात करावी.
- संसर्गजन्य आजार झालेल्यांनी प्रसाद तयार करू नये.
- प्रसाद तयार करणाऱ्यांनी आणि वाटप करणाऱ्यांनी नाक, कान, डोके, केस खाजवणे, डोळे चोळणे, शिंकणे, थुंकणे, नाक शिंकरणे टाळावे.
- वाटप करणाऱ्यांनी हात पुसण्यासाठी स्वच्छ कापडे वापरावे.
- प्रसाद तयार करणाऱ्यांनी हातमोजे आणि अ‍ॅप्रन घालावे, केस संपूर्णपणे झाकण्यासाठी टोपी वापरावी. तोंडाला मास्क लावावा.
- प्रसाद तयार करण्यासाठी, भांडी धुण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी पिण्यायोग्य असावे.
- पिण्याचे पाणी स्वच्छ भांड्यात साठवावे, त्यावर स्वच्छ झाकण असावे.
- निर्जंतुकीकरण करूनच पाणी पिण्यास द्यावे. भांड्यांचा वापर करण्यापूर्वी ती धुण्याच्या साबणाने, द्रावणाने स्वच्छ घासावीत.
- भांडी कोरडी करण्यासाठी स्वच्छ कपड्याचा वापर करावा, तसेच भांडी स्वच्छ, कोरड्या जागेत ठेवावीत.

प्रसाद तयार करून भाविकांना वितरित करणाऱ्या गणेश मंडळांनी https://foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर १०० रुपये शुल्क भरून नोंदणी करावी. मंडळांनी कच्च्या मालाची खरेदी परवानाधारक दुकानातूनच करावी आणि खरेदीचे बिल घ्यावे.
अभय देशपांडे, सहआयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन विभाग.

Web Title: distribute fresh prasad to devotees; FDA Notice to Ganesha Mandals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.