शेतकरी, महिला बचतगटांना ट्रायकोकार्ड किट वितरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:08 AM2021-07-25T04:08:14+5:302021-07-25T04:08:14+5:30
कोंढाळी : काटाेल पंचायत समितीच्या सभागृहात शनिवारी (दि. २४) आयाेजित केलेल्या कार्यक्रमात शेतकरी व महिला बचतगटांना ट्रायकोकार्ड किट वितरण ...
कोंढाळी : काटाेल पंचायत समितीच्या सभागृहात शनिवारी (दि. २४) आयाेजित केलेल्या कार्यक्रमात शेतकरी व महिला बचतगटांना ट्रायकोकार्ड किट वितरण करण्यात आले. हा उपक्रम महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर राबविला जात आहे.
याप्रसंगी पंचायत समिती उपसभापती अनुराधा खराडे, पंचायत समिती सदस्य संजय डांगोरे, कृषी विस्तार अधिकारी सचिन गोरटे, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक अंबादास बागडे, तालुका अभियान व्यवस्थापक प्रफुल्ल तायवाडे उपस्थित हाेते. या उपक्रमांतर्गत शेतकरी व महिला बचतगटाच्या सदस्यांना ट्रायकोग्रामा कार्ड निर्मितीबाबत प्रशिक्षण देण्यात आले. शेतकरी गट, महिला बचत गट, कृषी मित्र, कृषी सखी, प्रगतिशील शेतकऱ्यांना २० ट्रायकोकार्ड निर्मितीच्या किटचे वाटप करून सविस्तर मार्गदर्शन केले. ट्रायकोग्रामा कार्ड वापरामुळे भाजीपाल्यासह अन्य पिकांवरील विविध किडींचे व्यवस्थापन करणे सहज शक्य हाेत असल्याचेही सांगण्यात आले.