विदर्भस्तरीय निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:11 AM2021-08-24T04:11:48+5:302021-08-24T04:11:48+5:30
नागपूर : संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने सनराईज स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विदर्भस्तरीय निबंध स्पर्धेचे पुरस्कार वितरित ...
नागपूर : संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने सनराईज स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विदर्भस्तरीय निबंध स्पर्धेचे पुरस्कार वितरित करण्यात आले.
अध्यक्षस्थानी माजी शिक्षणाधिकारी नारायणराव जोशी होते तर व्यासपीठावर मुख्याध्यापिका पल्लवी कोरटकर, संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रकाश पुसदकर उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ निवेदिका सुचिता खनगई यांनी गुरुमहात्म्य या विषयावर विचार व्यक्त केले. सुगंधा देशपांडे यांनी गीत सादर केले. ध्येयगीत क्षिप्रा श्रीगिरीवार यांनी सादर केले. तद्नंतर विदर्भस्तरीय निबंध स्पर्धेतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. प्रथम पुरस्कार सुचिता खनगई, द्वितीय पुरस्कार प्रज्ञा फुले व तृतीय पुरस्कार रोशनी जोशी यांना प्रदान करण्यात आला. प्रोत्साहन पुरस्कार सुगंधा देशपांडे व नीतेश मस्के यांना प्रदान करण्यात आला. यावेळी नीलिमा लांबे यांना उपक्रमशील शिक्षक म्हणून गौरविण्यात आले. संचालन अभिजित बोरीकर यांनी केले तर आभार आरती देव यांनी मानले. याप्रसंगी स्वाती कुळकर्णी, उषा भांडारकर उपस्थित होते.
..............