नागपुरात ३२ हजारांवर लाभार्थ्यांना ई-कार्ड वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 08:09 PM2019-09-26T20:09:41+5:302019-09-26T20:12:37+5:30

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ई-कार्ड वितरणाची व्यवस्था महापालिकेच्या ३२ प्राथमिक आरोग्य केंद्र व हेल्थ पोस्टमध्ये नि:शुल्क करण्यात आली आहे. आजवर ३२ हजारांवर ई-कार्ड वाटप करण्यात आले आहे.

Distribution of e-card to 32 thousand beneficiaries in Nagpur | नागपुरात ३२ हजारांवर लाभार्थ्यांना ई-कार्ड वाटप

नागपुरात ३२ हजारांवर लाभार्थ्यांना ई-कार्ड वाटप

googlenewsNext
ठळक मुद्देमनपाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ई-कार्ड वितरण सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वसामान्य रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा, आरोग्यावरील खर्चापासून लोकांना संरक्षण मिळावे .यासाठी केंद्र सरकारतर्फे सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ई-कार्ड वितरणाची व्यवस्था महापालिकेच्या ३२ प्राथमिक आरोग्य केंद्र व हेल्थ पोस्टमध्ये नि:शुल्क करण्यात आली आहे. आजवर ३२ हजारांवर ई-कार्ड वाटप करण्यात आले आहे.
ई-कार्ड वाटप १२३ सिटीझन सर्व्हिस सेंटरमार्फत सुरू आहे. यासाठी प्रति व्यक्ती ३० रुपये शुल्क आकारले जाते. मात्र, महापालिकेने सुरू केलेल्या ई-कार्ड वितरणासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही. लाभार्थी यासाठी पात्र आहे किंवा नाही याबाबतची माहिती जवळच्या आरोग्य केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन जाणून घेता येईल. अथवा https://mera.pmjay.gov.in/serch/login  या संकेतस्थळावर आपले नाव आहे किंवा नाही हे जाणून घेता येईल, अशी माहिती मनपाच्या आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे यांनी दिली.
प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत महापालिका क्षेत्रात २३ खासगी व शासकीय रुग्णालये सेवा देणार आहे. यामध्ये विविध प्रकारच्या १३०० आजारांकरिता पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार देण्याची सुविधा उपलब्ध आहे. या योजनेंतर्गत सन २०११ च्या जातीनिहाय, सामाजिक, आर्थिक जनगणनेमधील काही निकषांवर आधारीत लाभार्थ्यांना दरवर्षी प्रती कुटुंबासाठी पाच लाखांपर्र्यंतचे आर्थिक कवच विमारूपाने उपलब्ध करण्यात आले आहे.
यामध्ये नोंदणी व बेड शुल्क, नर्सिंग व बोर्डिंग शुल्क, सर्जन, भूलतज्ज्ज्ञ, वैद्यकीय आणि सल्लागार फी, रक्त संक्रमण, ऑपरेशन शुल्क, शस्त्रक्रिया उपकरणांची किंमत, औषधे, पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी, एमआयआर, सिटीस्कॅन, सोनोग्राफी, डिस्चार्जनंतर १५ दिवसांपर्यंत चाचणी व औषध आदींचा समावेश आहे.
महापालिकेंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी एकूण पात्र लाभार्थी २,१९,७७० आहेत. त्यापैकी आजपर्यंत ४२५०६ लाभार्थ्यांचे ई-कार्ड तयार झालेले आहे. उर्वरितांनी त्वरित जवळच्या महापालिका आरोग्य केंद्राशी संपर्क साधून आपले नाव तपासून घ्यावे. असल्यास रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड, आधारकार्ड किंवा कुठलेही शासकीय ओळखपत्र दाखवून ई-कार्ड तातडीने तयार करून घ्यावे, असे आवाहन सोनकुसळे यांनी केले आहे.

Web Title: Distribution of e-card to 32 thousand beneficiaries in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.