गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:08 AM2021-05-29T04:08:29+5:302021-05-29T04:08:29+5:30
कन्हान : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने लाॅकडाऊनची घाेषणा केली. त्यामुळे अनेक छाेटे व्यवसाय ठप्प झाल्याने त्या व्यवसायांवर उपजीविका करणारे ...
कन्हान : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने लाॅकडाऊनची घाेषणा केली. त्यामुळे अनेक छाेटे व्यवसाय ठप्प झाल्याने त्या व्यवसायांवर उपजीविका करणारे कुटुंब आर्थिक संकटात सापडले. त्यांना दिलासा देण्यासाठी टेकाडी (ता. पारशिवणी) येथील युवा मित्र या सामाजिक संघटनेने पुढाकार घेत लाेकवर्गणी गाेळा केली आणि त्यातून जीवनाश्यक वस्तूंची खरेदी करीत त्या वस्तूंचे गरजूंना वाटप केले.
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना जबर धक्के बसले. लाॅकडाऊनमुळे राेजगार व व्यवसाय बंद झाले. त्यामुळे मजुरी करून तसेच छाेट्या व्यवसायावर उपजीविका करणाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले. लाॅकडाऊन संपणार कधी व राेजगार मिळणार कधी, तसेच छाेटे व्यवसाय सुरू हाेणार कधी, ही विवंचना घरातील सदस्यांना सतावत आहेत. त्यातच युवा मित्र या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘एक हात माणुसकीचा’ उपक्रम सुरू करीत साेशल मीडियावर आवाहन केले. साेबतच त्यांनी गावातील गरीब व गरजूंची यादीही तयार केली. अनेकांनी त्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत सढळ हाताने आर्थिक व वस्तूंच्या रूपात मदत केली. मिळालेल्या रकमेतून त्यांनी विविध जीवनावश्यक वस्तू खरेेदी करीत त्यांच्या किट तयार केल्या व त्या किटचे गरजूंना वाटपही केले. या उपक्रमात महादेव खेडकर, किशोर गुरव, प्रकाश गोले, नंदू लेकुरवाळे, मारोती हूड, सचिन हूड, प्रज्वल गाडबैल, सौरभ नाकतोडे, अर्जुन पवार, राहुल वासाडे, अमित वासाडे, योगेश सावरकर, मनोज लेकुरवाळे, अमोल हूड, सतीश घारड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.