केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात धान्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:07 AM2021-06-03T04:07:55+5:302021-06-03T04:07:55+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : काेराेना संकटामुळे अनेकांचा राेजगार बुडाला तर शेकडाे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. लाॅकडाऊनमुळे पारंपरिक व्यवसाय ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : काेराेना संकटामुळे अनेकांचा राेजगार बुडाला तर शेकडाे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. लाॅकडाऊनमुळे पारंपरिक व्यवसाय बदलून इतर व्यवसाय करावा लागत आहे. काेराेना महामारीच्या संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना दिलासा देण्याकरिता शासनाने केशरी (एपीएल) शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात धान्य वाटपाचा निर्णय घेतला आहे. सावनेर तालुक्यातील ८,४१९ लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
काेराेना साखळी ताेडण्यासाठी शासनाने लाॅकडाऊन लागू केले. यामुळे गाेरगरीब मजूर, व्यापारी, विद्यार्थी आदींना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. शिवाय, अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. राेजगार बुडाल्याने दाेनवेळच्या जेवणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. अशावेळी पैसा आणायचा कुठून, असा प्रश्न अनेकांना भेडसावत आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने अन्नसुरक्षा याेजना आणि शेतकरी याेजनेंतर्गत समाविष्ट कार्डधारकांना माेफत गहू, तांदूळ आदी धान्य वाटप केले. परंतु केशरी शिधापत्रिकाधारकांना याेजनेत धान्य मिळत नव्हते. आता राज्य शासनाने सर्व केशरी शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यात सवलतीच्या दरात धान्य देण्याचे निश्चित केले आहे. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बाेलावून त्यांना त्याबाबतचे निर्देश दिले आहे.
सावनेर तालुक्यात ८,४१९ केशरी शिधापत्रिकाधारक असून, त्यांना या याेजनेचा लाभ मिळणार आहे. या शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती एक किलाे गहू आठ रुपये दराने तर एक किलाे तांदूळ १२ रुपये दराने मिळणार आहे. या याेजनेत दाेन महिन्याचे धान्य एकाचवेळी वितरित केल्या जाईल. केशरी शिधापत्रिकाधारकांनी या याेजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार सतीश मासाळ व अन्न पुरवठा निरीक्षक वसुधा रघटाटे यांनी केले आहे.