लोकमत टाइम्स एक्सलन्स हेल्थकेअर अवॉर्डचे सोमवारी वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 10:55 PM2020-01-25T22:55:25+5:302020-01-25T22:59:17+5:30
लोकमत टाइम्स एक्सलन्स हेल्थकेअर अवॉर्ड-२०२० पहिल्या आवृत्तीचे वितरण २७ जानेवारीला होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकमत टाइम्स एक्सलन्स हेल्थकेअर अवॉर्ड-२०२० पहिल्या आवृत्तीचे वितरण २७ जानेवारीला होणार आहे. मेडिसीन आणि हेल्थकेअर क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणारे डॉक्टर्स आणि मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी दुपारी ३.३० वाजता रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये आयोजित समारंभात पुरस्कार देण्यात येणार आहे.
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे माजी महासंचालक व राष्ट्रीय संशोधनकर्ते प्रा. डॉ. रघुनाथ माशेलकर आणि पुणे येथील संचेती हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष व मुख्य ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. के.एच. संचेती प्रमुख अतिथी राहतील. ते उपस्थितांना मार्गदर्शन करतील. इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे आणि एसबीएस बायोटेक, चंदीगडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव जुनेजा अतिथी म्हणून उपस्थित राहतील. यावेळी विशेषरीत्या लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा उपस्थित राहणार आहेत.
विभिन्न श्रेणीत पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरुष व महिला श्रेणीत दोन लाईफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार तसेच पाच आऊटस्टॅन्डिंग कॉन्ट्रिब्युशन पुरस्कार आणि १० एक्सलन्स इन हेल्थकेअर पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये नऊ व्यक्तिगत एक्सलन्स पुरस्कार आणि एक हॉस्पिटल श्रेणीचा समावेश आहे.
पुरस्कार निर्णायक मंडळात वरिष्ठ फिजिशियन डॉ. एस.एन. देशमुख हे अध्यक्ष आणि वरिष्ठ रेडिओलॉजिस्ट डॉ. राजू खंडेलवाल सचिव आहेत. निर्णायक मंडळाच्या सदस्यांमध्ये वरिष्ठ कॉर्डियोथोरॅसिक सर्जन डॉ. पी.के. देशपांडे, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेडिकल कॉलेजचे वरिष्ठ गायनॅकोलॉजिस्ट डॉ. जे. फिदवी, वरिष्ठ फिजिशियन डॉ. रमेश मुंडले, वरिष्ठ मनोचिकित्सक डॉ. सुधीर भावे, वरिष्ठ फिजिशियन डॉ. निखिल बालंखे, आयएमए नागपूचे अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला, ऑरेंज सिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनुप मरार, लोकमत समूहाचे संचालक (परिचालन) अशोक जैन, लोकमत समूहाचे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंह यांचा समावेश आहे.
पुरस्कार श्रेणी
- मेडिसिन व संबंधित
- सर्जरी व संबंधित
- प्रसूती व स्त्रीरोग
- नेत्ररोग
- बालरोग
- सुपर स्पेशलिटी (मेडिसीन)
- सुपर स्पेशलिटी (सर्जरी)
- फॅमिली फिजिशियन
- रेडिओलॉजी/ पॅथालॉजी
- रुग्णालय (हॉस्पिटल)
५- आऊटस्टॅन्डिंग कॉन्ट्रिब्युशन पुरस्कार
२- लाईफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार (पुरुष-महिला)