दंडात्मक कारवाईसाेबतच मास्कचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:09 AM2021-03-19T04:09:07+5:302021-03-19T04:09:07+5:30
बेला : काेराेना संक्रमण वाढत असतना ग्रामीण भागातील नागरिक अद्यापही घराबाहेर पडण्यापूर्वी मास्कचा वापर करीत नाही. त्यामुळे बेला (ता. ...
बेला : काेराेना संक्रमण वाढत असतना ग्रामीण भागातील नागरिक अद्यापही घराबाहेर पडण्यापूर्वी मास्कचा वापर करीत नाही. त्यामुळे बेला (ता. उमरेड) पाेलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाेबतच नागरिकांना मास्कचे वितरण केले.
काेराेना संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी पाेलीस प्रशासनाच्या वतीने ग्रामीण भागात जनजागृती केली जात आहे. पाेलीस कर्मचारी नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचा नियमित वापर आणि सुरक्षित अंतर, या त्रिसूत्रीचे महत्त्व पटवून देत आहेत. या माेहिमेंतर्गत बेला पाेलिसांनी १५० नागरिकांना मास्कचे माेफत वितरण केले. शिवाय, मंगळवार (दि. १६) व बुधवारी (दि. १७) मास्क न वापरणाऱ्या ३३ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करीत त्यांच्याकडून ६,६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई टाळण्यासाठी कुणीही विनामास्क घराबाहेर पडू नये, असे आवाहन पाेलिसांनी केेले आहे. या माहिमेत नायब तहसीलदार नंदेश्वर, वैद्यकीय अधिकारी डाॅ. स्वप्निल डडमल, विकास ढाेके यांच्यासह महसूल, पंचायत व पाेलीस विभागातील कर्मचारी सहभागी झाले आहेत.